Pune News : पुण्यातील नाना पेठेतील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; 3 पत्ती जुगार खेळाताना 24 जण आढळले, दोघा चालकांसह 26 जणांविरूध्द गुन्हा, 14 मोबाईल अन् 2.18 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील नागझरी लगत असलेल्या नाना पेठेतील हॉलमध्ये सुरू असलेल्या मोठया जुगार अड्डयावर पोलिसांनी शनिवारी (दि.26 डिसेंबर) रात्री छापा टाकला. पोलिसांनी हॉलमध्ये तब्बल 24 जण 3 पत्ती जुगार खेळत असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी जुगार अड्डा चालविणार्‍या सोमनाथ सयाजी गायकवाड (36, रा. सर्व्हे नं. 38, नाना पेठ) आणि अशोक सिंग अंबिका सिंग (36, रा. गोपी चाळ, दापोडी) यांच्यासह 26 जणांविरूध्द समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जुगार अड्डयावरून तब्बल 2 लाख 18 हजार 680 रूपयाचा ऐवज तसेच 58 हजार 500 रूपये किंमतीचे 14 मोबाईल हॅन्डसेट जप्त केले आहेत. 26 जणांविरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4, 5 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यापुर्वीच अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त (परिमंडळ-1) प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी यापुर्वीच झोन-1 मधील सर्वच पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना हद्दीमध्ये कुठलाही अवैध प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बेकायदेशीररित्या चालणार्‍या प्रत्येक गोष्टींवर कारवाई करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. नाना पेठेमध्ये चालु असणार्‍या बाबींची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तेथे कारवाई केली आहे. आगामी काळात देखील झोन-1 मध्ये बेकायदेशीररित्या बाबींवर तात्काळ आळा घालण्यात येणार असल्याचं उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी स्पष्ट केलं.

खालील 26 जणांविरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4,5 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

आरोपीचे नाव व पत्ता –

1. सोमनाथ सयाजी गायकवाड (वय 36 वर्षे रा. 38 नाना पेठ, पुणे)
2. अशोक सिंग अंबिका सिंग (वय 36 वर्षे रा. गोपी चाळ, दापोडी, पुणे)
3. महेशकुमार सचनदेव जाधव (वय 34 वर्षे रा. गोपी चाळ, दापोडी, पुणे)
4. ओंकार उमेश बनसोडे (वय 20 वर्षे रा. राम मंदीर शेजारी आंबेगाव पठार, पुणे)
5. सुरज अशोक कासट (वय 34 वर्षे रा. 688 शुक्रवार पेठ, पुणे)
6. सुनिल मारूती दळवी (वय 45 वर्षे रा. मु. शिरगाव पो. सोमाटणे फाटा ता. मावळ, जि. पुणे)
7. अशोक लस्मण ओव्हाळ (वय 64 वर्षे रा. प्रायव्हेट रोड, घर. नं. 16 चाळ नंबर 25 मेरीटन हॉटेल मागे, पुणे)
8. बाबासाहेब भाऊसाहेब साठे (वय 35 वर्षे रा. गल्ली नंबर 2, ममता स्विटपुढे, दिघी, पुणे)
9. उमेश नंदु किरवे (वय 23 वर्षे रा. आंबेगाव पठार, स. नं. 2513, शंकर मंदीर जवळ, पुणे)
10. अक्षय गोरख भापकर (वय 26 वर्षे रा. 392/92 नवा मंगळवार पेठ, पुणे)
11. इस्माईल मैनुददीन उस्ताद (वय 32 वर्षे रा. स. नं. 24 पौळे चाळ, बोपोडी, पुणे)
12. दिपक दिनोर मंडल (वय 29 वर्षे रा. बालाजी नगर, रजनीकॉर्नर, पवार बिल्डिंग, पुणे)
13. प्रभाकर बळिराम पवार (वय 60 वर्षे रा. दांगड वस्ती, गणपती माथा, पुणे)
14. राजीक मेहबुब शेख (वय 22 वर्षे रा. वेताळ नगर मोरे सोसा. चिंचवड गाव, पुणे)
15. कुंदनकुमार प्रद्रिप साव (वय 27 वर्षे रा. गोपी चाळ बोपेाडी, पुणे)
16. राजेश कुमारेसन (वय 45 वर्षे रा. स. नं. 1/6/53 लेन नंबर 1, गणेश नगर मोहम्मदवाडी, पुणे)
17. सुर्यकांत कुमार सिंह (वय 36 वर्षे रा. बोपोडी भाजी मंडई, रेल्वे फाटकाजवळ, पुणे)
18. महाविर मंडल (वय 38 वर्षे रा. रजनी कॉर्नर, पवार बिल्डिंग, बालाजी नगर, पुणे)
19. महेंद्र प्रसाद (वय 49 वर्षे रा. रजनी कॉर्नर, पवार बिल्डिंग, बालाजी नगर, पुणे)
20. प्रविण प्रसाद घोटाळे (वय 42 वर्षे रा. गणराज कॉलनी नंबर 4, काळुबाई निवास भोसरी, पुणे)
21. कृष्णा तुकाराम पिनाटे (वय 50 वर्षे रा. काका चव्हाण शाळेजवळ, धायरी गाव, पुणे)
22. अविनाश रामदास महामुनी (वय 30 वर्षे रा. आंबेगाव पठार, स. नं. 18, धनकवडी, पुणे)
23. गजानन दिलीप आसलकर (वय 22 वर्षे रा. आंबेगाव पठार सनं. 25/12 धनकवडी, पुणे)
24. प्रफुल्ल दिलीप रणसिंग (वय 22 वर्षे रा. आंबेगाव पठार सनं. 25/10 धनकवडी, पुणे)
25. मनिष संगप्पा निंबरगे (वय 28 वर्षे रा. शिरोळे रोड, काकडे बिल्डिंग समोर, फॉर्चुन अपार्ट. पार्किगमध्ये, डेक्कन, पुणे)
26. अनिल अनंत चुरी (वय 59 वर्षे रा. हरिनारायण कॉम्प. वडगाव बु. फलॅट नंबर 23, पुणे)

या कारवाईबाबतचा अहवाल पोलिस उपनिरीक्षक पी.एच. काळे (नेमणुक – डेक्कन पोलिस स्टेशन, प्रतिनियुक्ती पोलिस उप-आयुक्त परिमंडळ-1) यांनी सादर केला असून याप्रकरणी पोलिस उप-आयुक्त परिमंडळ-1 येथे प्रतिनियुक्तीवर असलेल्या पोलिस हवालदार संतोष गेणु थोरात यांनी फिर्याद दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक खोपडे, तपास पथकाचे उपनिरीक्षक विशाल मोहिते करीत आहेत.