Pune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन – फरार घोषीत (Declared absconding) केलेल्या एका सराईत चोरट्याचा (Thief) पुणे (Pune News) पोलीस शोध घेत आहेत. हा चोरटा अत्यंत करामती आणि शातीर असून तो वेशांतर करण्यात पटाईत आहे. त्याच्यावर मुंबई, ठाणे, नाशिक आणि चाकण (Mumbai, Thane, Nashik and Chakan) परिसरात डझनभर गुन्हे (FIR) दाखल आहेत. ओम उर्फ पप्पू बाळकृष्ण सातपुते (वय 34, रा.बी /204, वास्तूसृष्टी बिल्डिंग, देसलेपाडा, डोंबिवली(पु), ठाणे) असे या सराईत आरोपीचे नाव आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

आरोपी हा मुळचा शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे (Talegaon Dhamdhere in Shirur taluka) येथील रहिवासी आहे. तो नवघर पोलीस ठाणे, मुंबई येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) आहे. त्याच्यावर मुंबईत नवघर, ठाणे, मुलुंड, मुंबईत गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्या संदर्भात न्यायालयात सुनावणीकामी हजर रहात नसल्याने मुलुंड न्यायालयाने त्याला 11 सप्टेंबर 2018 रोजी फरार घोषित केले आहे.

हा आरोपी चोऱ्या करण्यात सराईत असून शिक्षा देखील भोगून आलेला आहे. वेशांतर करण्यात पटाईत आहे. आरोपी डोंबिवली येथील पत्यावर वास्तव्यास नाही. फरार आरोपी सध्या भोसरी, पिंपरी-चिंचवड (Bhosari, Pimpri-Chinchwad) परिसरात वास्तव्य करत असल्याची खात्रीदायक माहिती (Information) मिळाली आहे. हा सराईत चोरटा कुणाच्या निदर्शनास आसल्यास त्वरित पोलिसांना संपर्क (Contact the police) करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – पोलीस उपनिरीक्षक महेश लामखडे (मो.क्र.9923896389), पोलीस हवालदार राजेंद्र खैरनार (मो. क्र.9769418004)

Wab Title :- Pune News | police search abscond criminal

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये