Pune News : हवाला प्रकरणात पोलिसांनी 3 कोटी 47 लाख रुपयांची रोकड केली जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   गुटखा विक्रीतून मिळालेली मोठ्या रकमेची देवाण-घेवाण हवाला मार्फत प्रकरणात पोलिसांनी 3 कोटी 47 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्यात 9 जणांना पकडण्यात आले आहे.

मुख्य आरोपी सुरेश मूलचंद अगरवाल (वय ५४ रा. खराडी) याला अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात चौकशी सुरू असताना पुणे पोलिसांनी त्यानंतर काल छापीमारी केली.

खराडीत बेकायदा गुटख्याची विक्री करणाऱ्या सुरेशला पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत त्याने नवनाथ नामदेव काळभोर गुटखा पुरवित असल्याची कबुली दिली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत गुटख्याचे मुख्य दोन विक्रेते असून हवाला मार्फत पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काल सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत पाच ठिकाणी छापे टाकून ३ कोटी ५२ लाख ७५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

You might also like