Pune News : कोंढव्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रबोधनपर पथनाट्याचे सादरीकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मोटार वाहन अपघातांना आळा बसावा, व वाहतूक नियमांचा प्रचार होण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कोंढवा वाहतूक विभागाच्या वतीने पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

kondhawa

माऊंट कार्णिवल हायस्कुलचे शिक्षक व विद्यार्थी तसेच बँड पथकाने रस्ता सुरक्षा, वाहतूक विषयक नियमांचे पालन करावे, यासाठी प्रबोधन करणारे पथनाट्य लुल्लानगर परिसरात सादर केले.

kondhawa

पथनाट्य सादरीकरणाच्या वेळी प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पथनाट्य सादर करणार्‍या विद्याथ्यांचे कौतुक केले. रस्ता सुरक्षा अभियानात शहरात विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सध्या केले जात आहे. कोंढवा वाहतूक विभागाने वाहतूक नियमांचे पालन करणार्‍या वाहनचालकांना विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रोत्साहनपर माहितीपत्रक व गुलाबपुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले.

kondhawa

कोंढवा वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे यांनी त्यावेळी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले. या उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक म्हस्के तसेच वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार, ५ शिक्षक आणि २५ विद्यार्थी सहभागी झाले होते.माउंट कर्णीवल च्या मुख्याध्यापिका सुचित्रा ए. सी. व RSP शिक्षक संदीप घोलप यांचे विशेष सहकार्य लाभले.