Pune News : ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’व्दारे 5 जानेवारीला धरणा आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मुस्लिन राष्ट्रीय मंच तर्फे पुण्यात मंगळवार दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.30 ते 1230 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर मुस्लिम राष्ट्रीय मंच चे पदाधिकारी व कार्यकर्ते पाकिस्तान व चीनच्या विरूधात धरणा आंदोलन करतील व पत्रके वाटतील. अशी माहिती राष्ट्रीय संयोजक डॉ. लतीफ मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

1947 मध्ये पाकिस्तानने अधिकृत जम्मू-काश्मीर गिलगित, बाल्टीस्तान हा भारताचा भू-भाग ताब्यात घेतलेला आहे . तसेच अक्साई चीन हा भू-भाग चीन ने काबीज केलेला आहे . तो संपूर्ण भारताचा भू-भाग परत द्यावा अशी मागणी पाकिस्तान व चीनच्या सरकारला करण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांना शिष्टमंडळ भेटून निवेदन सादर करण्यात येणार आहे .

त्याचप्रमाणे फारूख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूब मुफ्ती यांनी पाकिस्तान व चीनची वाजू घेऊन भारता विरुध वक्तव्य केले म्हणून या तिन्ही जणांनी भारत सोडावा व आपल्या पसंतीच्या देशात म्हणजेच पाकिस्तान, चीन किंवा तुर्कीस्तान देशात निघून जावे अशी मागणी करण्यात येणार आहे. पुणे,मुस्लिन राष्ट्रीय मंच,पाकिस्तान, चीन,धरणा आंदोलन,डॉ. लतीफ मगदूम,