Pune News | पुणेकरांची सिंहगडावर तुफान गर्दी, कोरोना नियमांचा उडाला बोजवारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु असले तरी राज्य सरकारकडून (Maharashtra Government) अद्याप निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आलेले नाहीत. पर्यटनस्थळांवरही बंदी (Tourist spot closed) घालण्यात आली आहे. पण तरीही नागरिकांनी पर्यटनस्थळांवर तोबा गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिंहगड (Sinhagad) Pune News पर्यटक व गडप्रेमींसाठी खुला (tourists and fort lovers) करण्यात आलेला नाही. तरी देखील आज (रविवार) पहाटेपासून ते दुपारपर्यंत पर्यटकांनी (Tourist) कोरोना नियमांचे उल्लंघन (Violation of corona rules) करुन मोठी गर्दी केली. त्यामुळे पुणेकरांना Pune News कोरोनाचा विसर पडला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

वनविभाग व पोलीस प्रशासन हतबल
पुणेकरांचे जवळचे अन् आवडीचे फिरण्याचे ठिकाण म्हणजे सिंहगड. पण कोरोनामुळे (corona) गेल्या काही महिन्यांपासून सिंहगड (Sinhagad) पर्यटक आणि गडप्रेमीसाठी बंद आहे. तरीही रविवारी (दि.13) पहाटेपासूनच पुणेकरांनी सिंहगडावर तुफान गर्दी (crowd) केली होती. यावेळी हजारो पर्यटक (Tourist) सिंहगडावर विनामास्क, सोशल डिस्टंसिंग न पाळता (Without masks, without social discrimination) मुक्त संचार करत होते. त्यामुळे कोरोना नियमांचा पुरता फज्जा उडाला होता. अचानक मोठ्याप्रमाणात गर्दी वाढल्याने वनविभाग व पोलीस (Forest Department and Police) प्रशासन हतबल झाले होते.

पर्यटकांची कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत
प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्या नंतरचा हा पहिला रविवार (First Sunday) होता. त्यामुळे पुणेकर पर्यटनासाठी, ट्रेकिंगसाठी (trekking) घराबाहेर पडून सन्डे एन्जॉय (Enjoy Sunday) केला. सिंहगडावरील गाडीतळ वाहनांनी भरला होता. वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी गडावर जाण्यास बंदी असल्याचे सांगत होते. तरीही पर्यटक न ऐकता हुज्जत घालत गडावर जात होते. गर्दी झाल्याचे लक्षात येताच हवेली पोलीस ठाण्याचे (Haveli Police Station) पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी इतर ठिकाणांवरील बंदोबस्त कमी करुन तो सिंहगडाकडे वळवला. मोठ्या प्रयत्नांनंतर गर्दी कमी करण्यात पोलिसांना यश आले.

… तर गुन्हे दाखल केले जातील
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार (Collector’s order) सिंहगड पर्यटकांसाठी अद्यापही बंद आहे. त्यामुळे कोणीही नियमांचे उल्लंघन करून गडावर गर्दी करु नये. अन्यथा गुन्हे (FIR) दाखल करण्यात येतील. शासनाचे आदेश (Government orders) पाळून सहकार्य करावे असे आवाहन वनविभाग व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : pune news public break rules of covid 19 on sinhagad fort

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा