Pune News : पुण्यातील कलाकारांची ‘जस्ट गंमत’ या नाटकाने बालगंधर्व येथे सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील कलाकारांचे जस्ट गंमत या नाटकाने बालगंधर्व येथे आज सुरुवात झाली. कोरोना संकटामुळे मरगळलेल्या मनोरंजन क्षेत्रावर आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.. शहरातील बहुतांश नाटयगृह सुरु झाले आहेत. नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम सादर होऊ लागले आहेत. या कार्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी अ.भा. म नाटय परिषद पुणे द्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले.

पुण्यातील कलाकारांचे जस्ट गंमत या नाटकाने सुरुवात झाल्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात अखिल भारतीय महाराष्ट्र नाट्य परिषद पुणे चे मेघराज राजेभोसले यांचा सन्मान कलाकारांनी पुणेरी पगडी, शाल आणि तलवार देऊन केला. या वेळी जेष्ठ अभिनेते काळुराम ढोबळे व स्वानंद देव यांचाही सन्मान करण्यात आला. जेष्ठ विधीतज्ञ सुधाकर औटी यांच्या हस्ते सर्वाचा गौरव करण्यात आला. अभिनेते प्रशांत बोगम,अभिनेते सचिन गवळी, जगदीश चव्हाण, अविनाश किर्ती, आनंद खुडे, कुणाल देशमुख, अण्णा गुंजाळ, गणेश रणदिवे, विकास वाघमारे, योगेश शिरोळे, स्वप्नील मददेल, इत्यादी कलाकार यावेळी उपस्थित होते.