Pune News : पुण्याच्या आयटी व्यावसायिकाने दिव्यांग विद्यार्थ्यांनसाठी विकसित केले विनामूल्य ‘सॉफ्टवेअर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे(Pune) स्थित आयटी व्यावसायिक असलेल्या उदय मेहता यांनी आकलन अकार्यक्षमता असलेल्या मतिमंद व द्ष्टीहीन विद्यार्थ्यांना करिता विनामूल्य सोल्युशन विकसित केले आहे. या नवीन सोल्युशन द्वार मुलांना आरएफआयडी इंटर फेस च्या माध्यमातून रंजक पध्दतीने ज्ञान प्राप्त करण्याकरिता मदत होणार आहे. हा उपक्रम फक्त अभ्यासक्रमापुरता मर्यादित न ठेवता यामध्ये फिजिओथेरपी समाविष्ट करण्याचे उदय मेहता यांचे उद्दिष्ट आहे.

उदय मेहता हे सिध्द दिव्यांग ॲकॅडमीचे संस्थापक असून स्वतः एका 34 वर्षीय दिव्यांग मुलाचे यांचे वडील आहेत. ते आयआयटी बॉम्बे 74 ईई उचचे माजी विद्यार्थी असून ते 18 वर्ष अमेरिकत कार्यरत होते. या टेक्निकल सोल्युशनबद्दल माहिती देताना उदय मेहता म्हणाले की, आम्ही 2016 मध्ये भूतान आणि पुणे येथील काही शाळामध्ये या सोल्युशनची पहिली आवृत्ती कार्यान्वित केली. त्यानंतर वापरकत्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारावर आता याची दुसरी आवृत्ती तयार आहे. या आवृत्तीमध्ये मराठी आणि गुजराती सारख्या प्रादेशिक भाषांचा देखील समावेश करण्यात आला आहे. प्रायोगिक शिक्षण आणि मूल्यांकनावर आधारित कार्यक्रमामध्ये सनकिडस दिव्यांग किट, त्रिमितीय वस्तू (उडी ऑब्जेक्टस), आरएफआयडी रीडर आणि सनकिड्स दिव्यांग ॲप्लिकेशनचा वापर केला जातो.

आरएफआयडी रीडर आणि टॅग इंटरफेसच्या आधारावर मुलांना वस्तू आणि छायाचित्रांचा वापर करून शिकता येते. आरएफआयडी टेंगमध्ये दृष्टिहीन मुलांना मदत करण्यासाठी छायाचित्रे आणि ब्रेल अक्षरे आहेत. हाच मल्टीमिडिया आशय गुगल प्लेवर उपलब्ध असलेल्या इंटरऑंक्टिव्ह मोबाईल ॲपद्वारे विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील दिला जातो.याशिवाय प्रत्येक सत्रानंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत सखोल विश्लेषण प्राप्त होऊ शकते, त्यामध्ये विविध प्रकारचे आवाज, रंग आकार, प्राणी इत्यादींमधील फरक कळण्याची क्षमता याचा समावेश आहे. हे डेटा ॲनालिटिक्स किंवा विश्लेषण वय,बुध्दिमतेची पातळी (आयक्यू लेव्हल), कोणता विकार आहे, शारीरिक विकाराची पातळी अशा अनेक गोष्टीवर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वेगळे असते.

ते पुढे म्हणाले की, आम्ही या सोल्युशनची दुसरी आवृती पुणेस्थित सामाजिक संस्था असलेल्या अभिसार फाउंडेशनच्या मदतीने कार्यान्वित करण्यासाठी सुरुवात केली आहे. सध्या सातारा येथील आशा भवन है शारीरिक व मानसिकृष्ट्या अपंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेले अनाथ आश्रम येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.येथे 50 विद्यार्थी आहेत. याशिवाय आम्ही है। सोल्युशन निगडी येथील कामायनी शाळेत देखील प्रस्थापित केले असून तेथे लवकरच याचा वापर सुरू होईल. या सोल्युशनमधी युजर इंटरफेस हा अगदी सोपा आणि सुलभ असून केवळ चार तासांत याचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाऊ शकते. याशिवाय ऑनलाईन स्क्रीन शेअरींग अप्लिकेशन द्वारे आम्ही ऑनलाईन सपोर्ट देखील देतो.