Pune News | पुणे शहर काँग्रेसचे कार्यालय सचिव उत्तम भूमकर यांचे काँग्रेस भवनात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News | काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन सचिव उत्तम भूमकर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने आज रविवारी दुपारी निधन झाले. ते ८० वर्ष वयाचे (Pune News) होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस भवनात (Congress Bhavan) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Prithviraj Chavan) यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार, वृक्षारोपण असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या तयारीची पहाणी करीत असताना भूमकर अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते. भूमकर यांच्या निधनाची वार्ता कळताच काँग्रेस भवनात श्रध्दांजली वाहून कार्यक्रम रद्द करण्यात आले.

गेली तीस वर्ष कॉंग्रेस भवनात कार्यालयीन सचिव म्हणून भूमकर काम पहात होते. पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे ते माजी सदस्य होते. काँग्रेसज्येष्ठ नागरिक संघाचे ते विद्यमान कार्याध्यक्ष होते.

Web Tital : Pune News | Pune City Congress Office Secretary Uttam Bhoomkar dies of heart attack at Congress Bhavan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Uddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा (व्हिडिओ)

Maharashtra Police | राज्यातील सुमारे 200 पोलिस निरीक्षकांचं ‘प्रमोशन’ लवकरच ! PI, उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या 5 ऑगस्टपर्यंत

Pune Crime | पुण्यातील नांदेड सिटीमध्ये नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या 17 वर्षीय श्रीया पुरंदरेची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Coronavirus | केंद्राकडून राज्याला अलर्ट ! महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण Lockdown होणार?