Pune News | आजचा दिवस हा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने ऐतिहासिक !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आजचा दिवस हा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या Pune City NCP दृष्टीने ऐतिहासिक असा दिवस आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास जेव्हा कधी लिहिला जाईल तेव्हा १९ जून २०२१ ही तारीख नक्कीच सुवर्णाक्षरांत लिहिली जाईल. याचं कारणही तितकंच खास आहे. पुण्यातील टिळक रोड वरच्या गिरे बंगल्यातून डेंगळे पुलाजवळील Dengle Bridge भव्य इमारतीत पुणे शहर Pune News राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय स्थलांतरित होत आहे. आजपर्यंत २०० स्क्वेअर फुटाच्या गिरे बंगल्यातुन चालणारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार यापुढे ६,००० स्क्वेअर फुटांच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयातून NCP Central Office चालणार आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजवरच्या प्रवासात पुण्यातील गिरे कुटुंबीयांचा सिंहाचा वाटा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार Sharad Chandra Pawar साहेबांप्रति असलेल्या प्रेमापोटी गिरे कुटुंबीयांनी टिळक रोड वरील आपला टुमदार बंगला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासाठी दिला.
एवढेच नाही तर गेल्या १८ वर्षांपासून गिरे कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जागेचे भाडे किंवा लाईटबिल यासाठी एक रुपयाही आकारलेला नाही.
स्थावर मालमत्तांचे दर गगनाला भिडत असताना पुण्यातील “प्राईम लोकेशन” ला असलेली आपली मालमत्ता तब्बल १८ वर्षे विनामोबदला वापरण्यास देणे यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी गिरे कुटुंबियांच्या मनात असलेली प्रेमभावना दिसून येते.

Ransom Case | खंडणी प्रकरण ! ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केलेल्या ‘त्या’ बडतर्फ पोलिसाचा जामीन फेटाळला

या गिरे बंगल्यातील gire bungalow कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बरीच लांबपर्यंत मजल मारली आहे.
याच कार्यालयातून पक्षाने शहरावर आपली पकड मजबूत केली,
हाच इमारतीतून अनेकदा पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा रोवला गेला,
येथूनच पुणे शहराच्या प्रगतीचा आलेख रचला गेला.
परंतु बदलत्या काळानुसार या कार्यालयातील जागा अपुरी पडू लागली, अनेक आधुनिक सुविधांची गरज भरायला लागली.
यादरम्यान पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा माजी महापौर श्री. प्रशांतदादा जगताप Former Mayor Shri. Prashantdada Jagtap यांच्या हाती आली.
शहराची सूत्रे हाती घेताच त्यांनी अक्षरशः संपूर्ण शहर अनेकदा पिंजून काढले.
प्रोटोकॉल ला केराची टोपली दाखवत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांशी थेट संवाद सुरू केला.
अवघ्या काही दिवसांतच प्रशांतदादा जगताप यांनी संपूर्ण शहरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरामोहरा बदलण्याची मोहीमच त्यांनी हाती घेतली.
याच मोहिमेचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे नवीन “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय”.

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे “सर्वोत्तम दर्जा” हीच ओळख कायम ठेवण्यासाठी शहराध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप यांनी का कार्यालयाच्या प्रत्येक बारीकसारीक कामात स्वतः जातीने लक्ष दिले.
त्यांच्या अथक प्रयत्नांतून अवघ्या १७ दिवसांत भव्य असे “राष्ट्रवादी काँग्रेस भवन” NCP Bhavan उभे राहिले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Pune News pune city ncp office opening news

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Unlock | पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनलॉकचे सुधारित आदेश जारी, जाणून घ्या काय बंद अन् काय सुरू

IRCTC iPay | झटपट बुक होते तिकिट आणि कॅन्सलेशननंतर मिनिटात मिळतो रिफंड, जाणून घ्या फीचर्स