Pune News | पुणे क्लायमेट वॉरियर ‘ ची पर्यावरणस्नेही उपक्रमांची घोषणा

शैक्षणिक वर्षात पर्यावरण दूत तयार करण्यासाठी 'अ‍ॅलर्ट' संस्थेचा पुढाकार

पुणे : Pune News | संस्कारक्षम शालेय वयात विद्यार्थ्यांना पर्यावरण प्रेम जागृत व्हावे आणि शालेय, कुटुंब, समाज स्तरावर पर्यावरण दूत तयार व्हावेत, या हेतूने ‘ अ‍ॅलर्ट संस्थेचा २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी ‘ पुणे क्लायनेट वॉरियर ‘ उपक्रम आज जाहीर करण्यात आला. (Pune News)

पुण्यातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था, व्यक्ती, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधींची परिषद ७ जून रोजी हॉटेल क्लर्क इन येथे आयोजित करण्यात आला होता. अॅलर्ट ‘ च्या संस्थापक खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सिंबायोसिस सेंटर फॉर क्लायमेट चेंज अॅण्ड सस्टेनॅबिलिटी आणि वनराई संस्थेचा सहभागही या उपक्रमात आहे. (Pune News)

शैक्षणिक वर्षासाठी पर्यावरण जागृती कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ‘ क्लायमेट चेंज ‘, ‘ट्रीज ‘, ‘ वेस्ट मॅनेजमेंट ‘, ‘ ग्रीन ऑडिट ‘, ‘ क्लायमेट प्लेज ‘, ‘ ग्रीन अॅन्युअल डे ‘ अशा संकल्पना महिन्यांनुसार असणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी पारितोषिक वितरण सोहळा असणार आहे.

वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर हे उपक्रम असणार आहेत. पर्यावरणस्नेही संस्कृती लहानपणापासून रुजविणे हा या उपक्रमाचा उद्देश असणार आहे.विद्यार्थ्याना पर्यावरण संवर्धनासाठी परिर्वतनाचे दूत करण्यासाठी हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

हरित वसुंधरा ‘ उपक्रमात ‘एक कुटुंब- एक झाड ‘ प्रती वर्षी, बिया रुजवा, पॉलीनेटर स्पर्धा असे कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात घेतले जाणार आहेत. संशोधनपर स्पर्धाही आयोजित केली , जाणार आहे.

सप्टेबर महिन्यात नदी, धरणा ना केंद्र स्थानी ठेवून चर्चासत्र, सहली आयोजित केले जाणार आहेत.

ऑक्टोबर मध्ये रिफ्युज, रिडयुस,रियुज, रिपरपज, रिसायकल या ५- आर ना समजून घेतले जाणार आहे. गांधी जयंतीनिमित श्रमदान केले जाणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात ‘हरित दिवाळी ‘ उपक्रम असणार आहे.

डिसेंबर महिन्यात ‘ ग्रीन अॅन्युअल डे ‘ संकल्पना हाती घेतली जाणार आहे.

जानेवारीत युवा परिषद आयोजित केली जाणार आहे. फेब्रुवारीत पारितोषिक वितरण सोहळा असणार आहे.

डॉ. गुरुदास नूलकर, संस्कृती मेनन, सारंग यादवाडकर, विनोद बोधनकर, डॉ. विनिता आपटे,अ‍ॅड. दिव्या चव्हाण,
अनिल मंद्रुपकर, संजिवनी जोगळेकर , डॉ.आरती देशमुख, डॉ. ओमप्रकाश, नितीन जाधव आदी उपस्थित
होते.पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत संस्था, व्यक्ती, शाळांचे , शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘ पर्यावरण धोक्यात आहे. आणि हा धोका पुण्यापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोचला आहे.
वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी उचलायला हवी. ‘पुणे क्लायमेट वॉरियर्स ‘ उपक्रमाद्वारे त्यात दोन वर्ष पुढाकार घेतला जात आहे ‘.

‘वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर हे उपक्रम असणार आहेत. पर्यावरणस्नेही संस्कृती लहानपणापासून रुजविणे हा
या उपक्रमाचा उद्देश असणार आहे.विद्यार्थ्याना पर्यावरण संवर्धनासाठी परिर्वतनाचे दूत करण्यासाठी हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत ‘, असेही खा. चव्हाण यांनी सांगीतले.

डॉ.नूलकर म्हणाले, ‘ विद्यार्थ्याबरोबर पालकांनाही पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभागी करून घेतले पाहिजे.

सारंग यादवाडकर म्हणाले, ‘ पुण्यात पर्यावरणाचा विध्वंस चालू असून जन जागृतीबरोबर मोठी लढाई लढावी लागणार आहे. ‘

डॉ. विनिता आपटे म्हणाल्या, ‘ प्रत्यक्ष कृती आणि सहभागावर भर देणे आवश्यक आहे. ते या उपक्रमातून साध्य होईल ‘.

अ‍ॅड. दिव्या चव्हाण यांनी आभार मानले

Web Title : Pune News | Pune Climate Warrior’s announcement of eco-friendly activities

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Bypoll Election | ‘…तर मी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार’, मनसे नेते वसंत मोरेंचं मोठं विधान

Palkhi Sohala 2023 – Pune Traffic Updates | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी 17 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात