Pune News | पुणे 4 वाजता लॉक झालंच पाहिजे, अन्यथा कडक कारवाई करा, अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News | पुणे शहरात (Pune City) कोरोनाबाधित रुग्णांच्य संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. पुणे शहरातील दुकाने दुपारी 4 ला बंद होतात. परंतु हातगाडीवाले, पथारीवाले 4 नंतर देखील सर्रास सुरु असतात. ते संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहातात. याठिकाणी नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांना (Pune Police) आणि प्रशासनाला शहर दुपारी 4 वाजता बंद झालेच पाहिजे, असा आदेश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. pune news | pune corona guidelines pune lock 4 clock strict instructions ajit pawars administration

अन्यथा कडक कारवाई करा…

अजित पवार यांनी प्रशासनाला आदेश देताना सांगितले की, जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई (Action) करा.
पुणे शहरातील निर्बंध कायम ठेवण्यात आल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले.
तसेच राज्य सरकारकडून (State Government) शनिवार आणि रविवारबाबत जे काही निर्णय झाले आहेत ते तसेच लागू राहतील असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्य उपस्थितीत कोरोना (Corona) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

शहरातील मृत्यू दर कमी

अजित पवार म्हणाले, मागील आठवड्यात पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) 6.2 होता. आता तो 6 टक्क्यांवर आला आहे. तसेच शहरातील मृत्यू दर देखील कमी झाला आहे.
दोन्हीही लसीकरणाचे टप्पे पूर्ण झाले असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे (Corona rule) पालन करणे आवश्यक आहे.
तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर होणाऱ्या गर्दीचे प्रमाण वाढले आहे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

50 लाखापर्यंत लसीकरण

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड (PCMC) आणि पुणे जिल्हा अशा ठिकाणी आपण 50 लाखापर्यंत लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे.
परंतु ज्या प्रमाणात लसीकरण पुरवठा व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही.
त्यामुळे लसीकरण ज्या वेगाने पूर्ण व्हायला हवे होते ते झाले नाही.
तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासोबतच पुणे शहरातील निर्बंध कायम ठेवण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पुण्यात काय सुरु काय बंद

महापालिकेने (PMC) नवीन आदेश काढत पुन्हा निर्बंध लागू केले आहेत.
अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणारी सर्व दुकाने दुपारी चारपर्यंत उघडी राहणार आहेत.
तसेच अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
परंतु ही दुकाने शनिवार आणि रविवार पूर्णत: बद ठेवण्याचे आदेश आहेत.
तर मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंदच राहणार आहेत.

रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील.
तर दुपारी 4 नंतर शनिवार व रविवार रात्री 11 पर्यंत फक्त पार्सल सेवा, घरपोच सेवा देता येईल.
सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने ही केवळ चालणे व सायकलिंगसाठी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते 9 या वेळेत सुरु राहतील.

तसेच सकाळी 5 ते 9 या वेळेत आऊटडोअर खेळ खेळता येतील.
याशिवाय व्यायामशाळा देखील 5 दिवस सुरु राहतील.
ई-कॉमर्स, कृषी संबंधी सर्व सेवा-व्यवसाय सुरु ठेवता येतील. संध्याकाळी 5 नंतर जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Web Title : pune news | pune corona guidelines pune lock 4 clock strict instructions ajit pawars administration

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

TCS Recruitment | कामाची गोष्ट ! जगातील सर्वात मोठी IT कंपनी देतीय 40 हजार लोकांना नोकरी; इन्फोसिसला सुद्धा पाहिजेत यावर्षी 26 हजार फ्रेशर्स

IAS Officer Transfer | राज्यातील 7 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या; ‘PMPML’ च्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती