Pune News | कुत्र्यांच्या नसबंदीच्या ‘ऑपरेशन’ थिएटरमध्ये उंदरांचा सुळसुळाट; बंदोबस्तासाठी ‘मांजरी’ पाळायच्या? (व्हिडीओ)

पुणे – Pune News | भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करण्यासाठीच्या ऑपरेशन थिएटर मध्ये उंदरांचा सुळसुळाट झाल्याने ऑपरेशन बंद आहेत. परंतु प्रशासन काहीच उपाययोजना करत नाही. आता त्या ठिकाणी उंदराचा त्रास कमी करण्यासाठी मांजरं पाळायची ? असा संतप्त सवाल करत भाजपच्या नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे (BJP corporator Madhuri Sahastrabuddhe) यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती समस्या सभागृहाच्या निदर्शनास आणून (Pune News) दिली.

 

 

 

 

माधुरी सहस्त्रबुद्धे (BJP corporator Madhuri Sahastrabuddhe) यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण (Pune Corporation General Body Meeting) सभेत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या भटक्या कुत्र्यांची नसबंदी 7 महिने बंद आहे. कुत्र्यांची दहशत वाढली आहे. त्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. प्रत्येक नगरसेवकाची तक्रार आहे. बाणेर व नायडू येथील डॉग पोण्ड नादुरुस्त आहेत. त्यामुळे कुत्र्यांची नसबंदी करणाऱ्या संस्था पुढे येत नाहीत. येथील ऑपरेशन थिएटर मध्ये उंदराचा सुळसुळाट झाला आहे. आता उंदराच्या बंदोबस्तासाठी मांजरी पाळायच्या आहेत ? काही संस्था मोफत नसबंदी करायला तयार आहेत. मग आपण त्यांची नियुक्ती का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

 

 

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

 

 

 

नगरसेवक सुभाष जगताप (NCP Corporator Subhash Jagtap) यांनी 2014 – 15 ला आपण नसबंदी केल्यानंतर पुढील चार पाच वर्षे संख्या वाढणार नाही, असे सांगितले होते.
मग संख्या कशी वाढत आहे असा प्रश्न उपस्थित करत नसबंदीचे काम जी संस्था मोफत काम करायला तयार आहे, त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी (Pune News) केली.
यावर स्पष्टीकरण करताना आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (PMC Head of Health Dr. Ashish Bharti) सांगितले की सध्या एक संस्था भटक्या कुत्रांच्या नसबंदीचे काम करत आहे.
आणखी एक निविदा काढली आहे. यातील एल 1 होता त्याला अडचण होती, त्यामुळे सेकंड लोवेस्ट ला काम देण्यात येईल.
तसेच ऑपरेशन थिएटर मध्येही दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात (Pune News) येईल.

हे देखील वाचा

Pune Police | पुण्यातील ‘त्या’ 19 पोलिस अधिकारी अन् अंमलदारांवर ‘घोर’ अन्याय?, जाणून घ्या प्रकरण

Gas Cylinder | एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची दुर्घटना झाल्यास मिळेल 50 लाखाचा फायदा ! तात्काळ जाणून घ्या प्रक्रिया

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Pune Corporation General Body Meeting BJP corporator Madhuri Sahastrabuddhe in PMC GB

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update