Pune News | पुणे : नशेतल्या तरूणींचा व्हिडिओ FB Live करणार्‍या ‘पिट्याभाई’ विरोधात महिला आयोगाकडे तक्रार (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पौड रोडवरील एआरएआय टेकडीवर शनिवारी सायंकाळी दोन तरुणी नशेत टुल्ल असलेल्या अवस्थेत आढळून आल्या. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील ‘पिट्याभाई’ म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी (Actor Ramesh Pardeshi) हे सायंकाळी वॉकिंगला गेले असता त्यांना हा प्रकार दिसला. रमेश परदेशी यांनी त्यांच्या फेसबुकवरुन लाईव्ह करुन हा प्रकार समोर आणला. मात्र, असे करणे परदेशी यांना अडचणीचे ठरु शकते. कारण रमेश परदेशी यांच्या विरोधात महिला आयोगाकडे (Women’s Commission) तक्रार करण्यात आली आहे. (Pune News)

रमेश परदेशी यांनी नशेत असलेल्या दोन मुलींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. यातील मुलीची अवस्था गंभीर होती. यावेळी परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह करताना त्या मुलींचा चेहरा दाखवला. याप्रकरणी महिली पत्रकार नेहा पुरव यांनी महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीची दखल महिला आयोगाने घेतली आहे. त्यामुळे रमेश परदशी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

नेहा पुरव यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, एक महिला म्हणून आणि एका तरुण मुलीची आई म्हणून मी या प्रकाराने खूपच अस्वस्थ झालेय.. पुण्यात 2 मुली नशेच्या अमलाखाली so called संस्कृती रक्षकांना आढळून आल्या… सगळ्यात आधी त्या मुलींनी जे केले ते अत्यंत चूकच आहे त्या बद्दल त्यांना माफ करताच येणार नाही पण या मुलींचे वय आणि त्यांची पुढची करिअर, पुढील आयुष्य बघता हा व्हीडिओ viral करणे किती योग्य होते? त्यांचे चेहरे न दाखवता स्वतःच्या समाजसेवेचा डांगोरा पिटता आला नसता का? ह्या प्रकारात मुलींचे फोटो दाखवणे हा गुन्हा आहे.. या मुलींच्या पालकांना सांगून आणि या मुलींचे काउन्सल्लिंग करून योग्य मार्ग निवडता आला नसता का?

मी या प्रकारानंतर पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशन मधुन पत्रकार म्हणून माहिती घेतली, तेव्हा या मुली बिअर
प्यायला होत्या आणि पोटात अन्न नसल्याने त्यांना नशा आल्याचे पोलिसानी सांगितले.. या मुलींनी drugs घेतले नव्हते…
पुन्हा सांगते मी मुलींना पाठीशी घालत नाही पण अशा प्रकारे व्हीडिओ viral करण्याला माझा आक्षेप आहे… मी महिला आयोगाकडे एक महिला म्हणून तक्रार नोंदवली आहे.

महिला आयोगाचे पोलिसांना पत्र

नेहा पुरव यांनी यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.
महिला आयोगाने कोथरुड पोलीस स्टेशला पत्र लिहून या प्रकरणी योग्य ती नियमांनुसार चौकशी करुन कार्यवाही करावी.
तसेच महिला आयोगा कार्यालयास वस्तुस्थितीदर्शक अहवाल तात्काळ पाठवावा असे महिला आयोगाच्या समुपदेश
नि-प्रकल्प अधिकारी अंजली काकडे यांनी पत्रात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पिंपरी : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने जिम ट्रेनरला 35 लाखांचा गंडा

CM Eknath Shinde | ”लिमीटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच मी…”, नाना पटोलेंशी बोलतानाचा मुख्यमंत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Pune Dhayari Crime | कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याने तरुणाला मारहाण, धायरी परिसरातील घटना