Pune News : पुणे महापालिकेचं Twitter अकाऊंट सस्पेंड, रिकव्हर करण्याचं काम सुरू
file photo
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेचं ऑफिशीअल ट्विटर अकाऊंट पीएमसी केअर हे सस्पेंड झाल्याचं आज (गुरूवारी) समोर आलं. त्यामुळे प्रचंड खळबळ आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेची टीम सस्पेंड झालेलं अकाऊंट पुन्हा रिकव्हर करण्याचं काम करत असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली आहे.
पुणे महापालिकेने पीएमसी केअर नावाचं ट्विटर अकाऊंट मे 2015 मध्ये सुरू केलं होतं. त्यावरून पुणेकरांना उपयुक्त माहिती दिली जाते. दरम्यान, या अकाऊंटचे 91 हजार 35 फालोअर्स आहेत. आज हे अकाऊंट सस्पेंड झाल्याचं समोर आल्यानंतर पुणे महापालिकेची टीम अकाऊंट रिकव्हर करण्यात मग्न झाली आहे. अद्यापही ते काम सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.