Pune News : पुणे पीपल्स को-ऑप बॅकेच्या ठेवी 1200 कोटी व एकूण व्यवसाय 1900 कोटी पार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील चार वर्षांतील भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल, नोटबंदी, त्यानंतर बांधकामक्षेत्रात आलेली मंदी व एकूणच उद्योग व्यवसायात आलेल्या अडचणी तसेच जागतिक अस्थिरतेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम या सगळ्या अडचणींच्या काळात सुध्दा पुणे पीपल्स को ऑप बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०२०-२०२१ आर्थिक वर्षात बँकेने ठेवींसाठी १२०० कोटी व एकूण व्यवसाय १९०० कोटींचा टप्पा पार केला आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीए जर्नादन रणदिवे यांनी दिली.

पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष डॉ.रमेश सोनवणे, संचालक ॲड.सुभाष मोहिते यांसह संचालक उपस्थित होते. मागील आर्थिक वर्षात मंदीमुळे झालेल्या घडामोडीत इतर बँकांच्या तुलनेत पुणे पीपल्स को ऑप बंकेने अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे.

सीए जर्नादन रणदिवे म्हणाले, ठेवींच्या व्याज दरात मोठया प्रमाणात घसरण झाल्यावर सुद्धा बँकांच्या तुलनेत पुणे पीपल्स को ऑप बँकेच्या ठेवींमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. कर्ज व्याज दरामध्ये असलेली तीव्र स्पर्धा इतकी जीवघेणी आहे कि चांगले कर्जदार टिकवणे खुपच कठीण आहे. परंतु अश्याही परिस्थितीत बँकेने कर्जदारांना चांगली सेवा व आकर्षक व्याज दर देऊन कर्जवाटपामध्ये वाढ केलेली आहे.

चालू आर्थिक वर्षांची सुरुवातच कोविडच्या भयावह परिस्थितीत झाली. अश्या संकट काळात सुद्धा पुणे पीपल्स को ऑप बँकेच्या सर्व सेवकांनी सरव्यवस्थापक सदानंद दिक्षीत यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पक भावनेने सर्व खातेदारांना अतिशय सुरक्षित व जिव्हाळ्याची सेवा दिली, करोना च्या काळात पुणे पीपल्स को ऑप बँकेच्या सर्व जेष्ठ खातेदारांना बँकेतील सेवकांनी घरपोच सेवा देऊन त्यांना अश्या अडचणीच्या काळात घरातच राहून काळजी घेण्याचे आवाहन केले. कोविडच्या काळात रिझर्व्ह बँकेने बऱ्याच मार्गदर्शक सूचना केल्या, त्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन पुणे पीपल्स को ऑप बँकेने केले आहे.

रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांबाबत घेतलेल्या काही निर्णयांचा परिणाम बँकांच्या प्रगतीवर होणार आहे. रिझव्ह बँकेने सहकारी बँकांचे एक्सपोजर लिमिट कमी केल्या मुळे अनेक उत्तम व्यवसाय असणाऱ्या मोठ्या खातेदारांना सहकारी बँका त्यांना आवश्यक कर्जपुरवठा करू शकणार नाहीत, याचा परिणाम असे उत्तम कर्जदार सहकारी बँकांपासून दुरावण्याची शक्यता आहे, तथापि पुणे पीपल्स को ऑप बैके ने याबाबतही नियोजनबद्ध विचार करून तसे धोरण ठरविले आहे. रिझर्व बँकेने सहकारी बँकांना त्यांच्या एकूण कर्जाच्या ५०% कजेही रु. २५ लाखाचे आत टेवण्याचे बंधन टाकले आहे. परंत अडचणीच्या काळातही पुणे पीपल्स को ऑप बैकेने त्याचे प्रमाण ५०% राहील याची काळजी घेतली हे. आहे. रिड्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचने नुसार बैंकाच भाडवल पर्याप्ततचे प्रमाण है ९% चे वर असणे आवश्यक असतानां बँकेचे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण हे मागील किल्येक वर्ष १२% च्या पुढे राखले आहे आणि हि खुप मोठी बाब आहे. इतर बँकांचा एकूण व्यवसाय कमी होत असताना पुणे पीपल्स को ऑप बँकेने अडचणीच्या काळातील उल्लेखनीय कामगिरी पुढील काळात मोठी कामगिरी करायला उद्युक्त करते.

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचने नुसार बँकांचे नेट एनपीए चे प्रमाण ६% चे आत आवश्यक असताना पुणे पीपल्स को ऑप बँकेने मागील तीन वर्ष हे प्रमाण ३% च्या आत राखले आहे. चालू आर्थिक वर्षात पुणे पीपल्स को ऑप बँकेचे नेट एनपीए चे प्रमाण हे ०% असेल या बाबत आम्हाला खात्री आहे. इतर बँकांचे ढोबळ एनपीए चे प्रमाण हे १०% चे वर असताना पुणे पीपल्स को ऑप बँकेने सदरचे प्रमाण ८% राखण्यात यश मिळवले आहे. इतर बैंकांचे तुलनेत पुणे पीपल्स को ऑप बँकेची सेवक उत्पादकता (इतर बँकांची सरासरी ६ ते ८ कोटी ) जास्त असून मार्च २१ ला ते प्रमाण ९ कोटी असेल.