Pune News : गजानन मारणे हाजीर हो ! पुणे पोलिसांकडून नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कायद्याच उल्लंघन करणाऱ्या सराईत गुन्हेगार गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांना तपासासाठी हजर व्हावे, यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. वारजे माळवाडी पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली असून, गजानन मारणे याच्या घरावर नोटीस चिटकवत त्याचा रीतसर पंचनामा केला आहे.

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गजानन मारणे व त्याच्या साथीदारांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन मारणे याच्यावर कारागृह ते पुणे रॅली काढत रॉयल इंट्रीप्रकरण चांगलंच महागत पडलं आहे. एक दोन म्हणत त्याच्यावर 5 ते 6 गुन्हे दाखल झाले आहेत. वारजेत देखील चांदणी चौकात आल्यानंतर त्याच्या साथीदार यांनी गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना ढकलून कोव्हीडचे नियम न पालता सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर गजा मारणे व त्याच्या साथीदार पसार झाले आहे. यानंतर पुणे पोलिसांनी अटकेच्या भितीने फरार झाला असे सांगितले. मात्र काहीच दिवसांपूर्वी गजानन मारणे वडगाव मावळ कोर्टात हजर झाला होता. यानंतर शोध घेणाऱ्या पोलिसांच्या पथकाचे नेमकी शोध मोहीम आहे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता.

दरम्यान आता याप्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी गजानन मारणे याला तपसासाठी हजर रहाण्याची नोटीस बजावली आहे. त्याच्या घरी ही नोटीस चिटकवत त्याचा पंचनामा केला आहे.