Pune News | पुण्यात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद; सिंगल डिजिट किमान Temp

पुणे : Pune News | दक्षिणेत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ऐन दिवाळीत पाऊस पडला असताना आता उत्तरपूर्वेकडील वार्‍यांचा जोर वाढल्याने गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. या हंगामात प्रथम पुण्यातील (Pune News) तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली गेला आहे. अचानक तापमानात घट (Winter) झाल्याने सकाळी फिरायला जाणार्‍यांनी स्वेटर, मफलर, हातमोजे बाहेर काढलेले दिसून येत होते.

पुणे शहरात (Pune News) बुधवारी किमान तापमान ११.८ अशं सेल्सिअसची नोंद झाली होती. त्यात आज आणखी घट झाली. पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि हवेली येथे ९.७ अंश सेल्सिअस आणि एनडीए हे आज सकाळी ९.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचवेळी पाषाण येथे १०.२, शिवाजीनगर येथे १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या हंगामात प्रथम पुणे जिल्ह्यात (Pune News) सिंगल डिजिट किमान तापमानाची नोंद झाली आहे.

या हंगामातील आतापर्यंतचे हे निच्चांकी किमान तापमान ठरले आहे. गेल्या वर्षी शिवाजीनगर येथे १२ नोव्हेबर २०२० रोजी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.

२७ नोव्हेबर २०१६ रोजी ९.३

१७ नोव्हेबर २०१४ रोजी ९.९

१९ नोव्हेबर २०१३ रोजी ७.९

तसेच २७ नोव्हेबर १९६४ रोजी पुण्यातील नोव्हेबर महिन्यातील सर्वात निच्चांकी ४.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद यापूर्वी झाली आहे.

हे देखील वाचा

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

Pune Corporation | निविदा काढल्या नसतानाही ‘एक कोटी’ रुपयांच्या कामांची बिले सादर ! कोरोना काळात ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर ‘दरोड्याचा प्रयत्न’; जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Pune recorded the lowest temperature of the season; Single digit minimum Temp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update