Pune News | नवीन मोबाइल अ‍ॅप लॉन्च ! पुणेकरांना मिळणार प्रत्येक 15 मिनीटाला पावसाची अद्ययावत माहिती, शेतकऱ्यांनाही फायदा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News । पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आजच्या पावसाळा परिस्थितीत केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (Union Ministry of Earth Sciences) 15 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणेवासीयांसाठी एक गिफ्ट प्रधान करण्यात आली आहे. मंगळवारी (27 जुलै) रोजी झालेल्या कार्यक्रमादरम्यान पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम राजीवन (Secretary M Rajivan) यांच्या हस्ते एका मोबाइल अ‍ॅपचं अनावरण केलं आहे. या मोबाइलवरून एका अ‍ॅपद्वारे पुणेकरांना (Pune News) दर 15 मिनिटांनी पावसाचं लाइव्ह अपडेट (Live updates) मिळणार आहे. आगामी पंधरा मिनिटामध्ये किती आणि कुठे पाऊस पडतो, याची सविस्तर माहिती मिळणार आहे.

याबाबत माहिती मिळण्यासंदर्भात आता हवामान विभागाच्या वेबसाइटवर अवलंबून राहावं लागणार नाही. सहजच आता आपल्या मोबाईलवर माहिती उपलब्ध राहणार आहे. या अ‍ॅपचं नाव ‘Pune Weather Live’ असं आहे. हे मोबाइल अ‍ॅप पुण्यातील आयएमडीच्या सरफेस इन्स्ट्रुमेंटेशन डीव्हीजन आणि महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभाग यांनी संयुक्तपणे विकसित केलंय. तर या अ‍ॅपवरून देशातील साधारण 80 वेधशाळांची माहिती गोळा करून ही अपडेट माहिती दिली जाणार आहे. या अ‍ॅपचा शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे.

‘Pune Weather Live’ हे अ‍ॅप आपल्या लोकेशनच्या अधारावर आजूबाजूच्या ठिकाणातील हवामानात काय परिवर्तन होत आहे,
याची माहिती देखील मिळणार आहे.
याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी माहिती दिली आहे की,
‘सध्याच्या हवामान मॉडेल्समध्ये 12 किमी पासून 5 किमी पर्यंत रिझॉल्युशन वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अशा पद्धतीनं हवामान अंदाज व्यक्त केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे.
त्यांचं उत्पन्न दुप्पट होऊ शकतं, असं त्यांनी सांगितलं आहे.

या दरम्यान, मंत्रालयाकडून आणखी एक महत्वाची माहिती देण्या आली आहे
की, ‘पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून राबवण्यात येणाऱ्या आगामी 5 वर्षांतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पा बाबतही माहिती दिली आहे.
संबंधित प्रकल्पांसाठी अलीकडेच तब्बल 4 हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
यात डीप ओशियन मिशन, ब्ल्यु इकोनॉमी, हवामानाबाद विविध संशोधन, ध्रुवीय विज्ञान, भूकंपविज्ञान सेवा आणि समुद्र तंत्रज्ञान अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे.
ब्ल्यु इकोनॉमी हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

Web Title :- Pune News | pune residents will get live rainfall updates for every 15 minutes farmers will get double benefit pune weather live app launch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IMD Alert | पुढील काही तासात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

SBI ने सुरक्षित ऑनलाइन बँकिंगसाठी Yono Lite App मध्ये दिले एक नवीन फीचर, जाणून घ्या डिटेल

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच; पुन्हा एकदा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला