Pune News | भिगवणमध्ये जुगार अड्यावर छापा, राजकीय नेते आणि शासकीय कर्मचाऱ्यांसह 26 जण पोलिसांच्या ताब्यात

भिगवण : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune district) भिगवण येथे सुरु असलेल्या जुगार (Gambling) अड्यावर भिगवण पोलीस ठाण्यातील (Bhigwan Police Station) पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी (Police officers and staff) छापा (Raid) टाकला. या कारवाईमध्ये पोलिसांनी राजकीय पदाधिकारी, शासकीय नोकरदार यांच्यासह नामवंत वस्ताद आणि व्हाईट कॉलर (White collar) नागरिकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबोडी रस्त्यावर असलेल्या डोंगराजवळ हा जुगार अड्डा सुरु होता. याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. त्यावेळी 8 टेबलांवर खेळवल्या जाणाऱ्या जुगार (Gambling) अड्ड्यावर 1 लाख 12 हजार 780 रुपयांची रकमेसह 3 लाख 12 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत अड्डा चालवणारा हनुमंत माणिक थोरात याच्यासह 26 जणांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई
पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने जुगार अड्ड्याची जागा सतत बदलण्यात येत होती. निंबोडी रस्त्यावर असलेल्या डोंगराजवळ जुगार (Gambling) अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रिमझिम पाऊस सुरु असताना फिल्मी स्टाईलने (Film style) या ठिकाणी प्रवेश केला. पोलिसांचा छापा पडल्याचे समजताच जुगाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची संधीच दिली नाही.

 

कोणालाही सोडणार नाही, पोलिसांचा इशारा

भिगवण पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांबरोबर (Political leaders) शासकीय कर्मचारी (Government employees), ग्रामपंचायत सदस्यासह (Gram Panchayat Member) बारामती परिसरातील नामवंत वस्ताद यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे. तर जुगाराच्या यादीतून आपले नाव पोलिसांनी वगळावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. परंतु पोलिसांनी कोरवाईत कोणालाही सोडणार नसल्याची माहिती दिली.

6 तालुक्यातील नामांकित लोक
पोलिसांनी केलेल्या करावाईमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, कर्जत, फलटण, माळशिरस अशा 6 तालुक्यातील नामांकित लोकांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी एकूण 26 जणांना ताब्यात घेतले.
ही कारवाई भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने आणि त्यांच्या पथकाने केली.

Wab Title :- pune news | pune rural police raid gambling den bhigwan along political leaders 26 people including government employees were detained

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा