Pune News : वर्चस्वाच्या वादातून खडकीच्या परिसरात 2 गटात तुफान राडा; परस्पर विरोधी गुन्हे दाखल, 9 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  वर्चस्वाच्या वादातून खडकीच्या पत्रा चाळ परिसरात 2 गटात तुफान राडा झाला असून, एकमेकांवर तलवारी, तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत खून करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. अचानक झालेल्या या वादाने मात्र परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती.  याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करत पोलिसांनी एकूण 9 जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी शेखर गायकवाड (वय 29) याच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी आकाश उत्तम गायकवाड (वय 20), सिध्दांत योगेश चव्हाण (वय 19), रोहित उर्फ बिट्या फ्रान्सिस अमोलिक (वय 30), पप्पू उर्फ जोसेफ आरकेदास मोती (वय 30) व शुभम बाळू सावन्त (वय 21, रा. गुलमोहर कॉलनी, पिंपळे गुरव) यांना अटक केली आहे. तर आकाश गायकवाड (वय 21) याच्या तक्रारीवर जग्या उर्फ प्रशांत राजू जाधव (वय 23), प्रतीक बबन धांडोरे (वय 19), शेखर संजय गायकवाड (वय 29), शिवाजी बापू जाधव (वय 35) यांना अटक केली आहे. त्यानुसार त्यांचे साथीदार व इतरांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर गायकवाड व त्यांचे मित्र जेवण पार्सल आणन्यासाठी जात होते. यावेळी आरोपींनी त्याला अडविले. तसेच तुझ्यामुळे आमच्या इजतीवर डाग लागला असून, तुला खल्लास केल्याशिवाय हिशोब पूर्ण होणार नाही, असे म्हणत कोयत्याने वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

तर आकाश गायकवाड याने तक्रारीत आरोपींनी अडवून माझा भाऊ खूप मस्ती करतोय असे म्हणत वाद घातला. तसेच त्यांनी बोपोडीत अजून फक्त शेखर हा एकच दादा आहे, असे म्हणत परिसरात दहशत माजवली आणि तलवारीने वार केले असल्याचे फिर्यादी लत म्हटले आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरात दहशत पसरली होती. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपींना अटक केली. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.