Pune News | कात्रजमध्ये दुचाकींवर झाड कोसळले, 22 दुचाकींचे नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात (Pune City) संतत पाऊस (Rain) सुरू झाल्यानंतर कात्रज (Katraj) येथे कामगारांनी (workers) पार्क (park) केलेल्या वाहनांवर (vehicle) मोठे झाड कोसळल्याची (tree collapse) घटना घडली असून, यात तब्बल 22 दुचाकीचे नुकसान (Damage) झाले आहे. गाड्या चुरा झाल्या आहेत. काल दिवसभरापासून पुणे शहरात (Pune News) 14 ठिकाणी झाडे कोसळली (tree collapse) आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

कामगारांच्या गाड्यांचे मोठे नुकसान
कात्रज भागात चौगुले इंडस्ट्रीज (Chowgule Industries) आहे. इंडस्ट्रीज शेजारी मोकळी जागा असून येथे कामगार वाहने लावतात. येथे मोठे झाड आहे. सावलीला म्हणून कामगार दुचाकी पार्क (Bike Park) करतात. आज दुपारी अचानक मोठे झाड कोसळले. त्यात पार्क केलेल्या 22 दुचाकी अडकल्या. झाड मोठे असल्याने या गाड्यांचा चुराडा झाला. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी धाव घेतली. झाड कापून वाहने दुचाकी बाजूला केल्या आहेत. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही.

EPFO | नोकरदारांनी लक्ष द्यावे | EPF नियमांमध्ये झाले ‘हे’ 5 मोठे बदल, जाणून घेतल्यास होईल फायदा

ही कामगिरी प्रभारी अधिकारी सुभाष जाधव (Subhash Jadhav),
तांडेल रामदास शिंदे (Ramdas Shinde), चालक गोगावले (driver Gogawale)
तसेच जवान महादेव मांगडे (Mahadev Mangade), पंकज इंगवले (Pankaj Ingwale), प्रसाद कदम (Prasad Kadam) व देवदूत जवान निलेश तागुंदे (Nilesh Tagunde),
श्रीकांत वाघमोडे, अविनाश लांडे (Srikant Waghmode, Avinash Lande) यांनी सहभाग घेतला आहे.

शहरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस (Rain) सुरू आहे.
तर अचानक सरी कोसळत असून, पुणेकरांची (Pune News) तारांबळ उडाली आहे.
दिवसभर पाऊस असल्याने बाहेर गर्दी कमी आहे.
दरम्यान वारे व पाऊस आल्यानंतर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
काल सकाळ पासून आजपर्यंत 14 घटना घडल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Titel : Pune News rain in pune city on friday 22 vehicles damaged due fall down big tree in katraj

हे देखील वाचा

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 172 नवीन रुग्ण, 253 रुग्णांना डिस्चार्ज

bhaichand hirachand raisoni माझी चौकशी राजकीय हेतूने नव्हती, तर बीएचआरची राजकीय कशी ?