Pune News : केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते जनसेवा फाऊंडेशनचे राजेश शहा सन्मानित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जनसेवा फाऊंडेशनचे राजेश शहा याना केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

जनसेवा फाऊंडेशन रस्त्यावरील मुलांसाठी(स्ट्रीट चिल्ड्रेन) राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था गेली अनेक वर्षांपासून करीत आहे. कात्रज येथे या मुलांना राहण्यासाठी वसतिगृह बांधले आहे. त्या ठिकाणाहून शहरातील विविध शाळांमध्ये या मुलांना पाठवले जाते. मुलांमधून काही भावी कुशल व गुणवंत खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने काही मुलांमधील विविध खेळांची कौशल्ये पारखून त्यांना “खेलो इंडिया” या मोहिमे अंतर्गत “इंडिया खेलेगा” या उपक्रमात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. या स्तूत्य उपक्रमाबद्दल जनसेवा फाऊंडेशनला स. प. महाविध्यालायाच्या रमाबाई हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा सन्मान जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने संस्थेचे खजिनदार राजेश शहा यांनी स्वीकारला. यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार श्रीमती मुक्ताताई टिळक व इतर मान्यवर उपस्थित होते