Pune News : काम मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कंपनीत चांगले काम मिळवून देतो तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याप्रकरणी एकास विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 16 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याबाबत 25 वर्षीय महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील नामदेव हरगुडे (वय 40, रा. गणेशनगर, सणसवाडी) यास पोलिसांनी अटक केली आहे. डिसेंबर 2020 मध्ये वेळोवेळी कटकेवस्ती (वाघोली) येथे हा प्रकार घडला. सुनील याने पिडीतेला सणसवाडी येथील कंपनीमध्ये नोकरी मिळवून देतो तसेच तुझ्याशी लग्न करतो, असे सांगून वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवला. नोकरी देण्यास टाळाटाळ करत तुम्ही खोटे बोलत आहे. त्यामुळे मी तुमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणार आहे, असे पिडीतेने सांगितल्यानंतर त्यांच्यावर चिडून आरोपीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी त्याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले होते.

गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करीत आरोपीला 16 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.