Pune News : कर्जाचा हप्ता भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने कोयत्याने वार करून वसुली मॅनेजरचा खून

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन – कर्जाचा हप्ता भरण्यास सांगितले म्हणून राग आल्याने कर्जदाराने वसुली मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार करून ठार केले ही घटना उरुळी कांचन येथे घडली.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनेजर रवींद्र प्रकाश वळकुंडे (वय २८) हे या हल्ल्यात ठार झाले आहेत.अमोल जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारी नुसार उरुळी कांचन येथील शिंदवणे रस्त्यावर सौरभ इमारतीत तिसऱ्या मजल्यावर बजाज फायनान्स या कंपनीचे कार्यालय आहे यामधून राहुल लक्ष्मण गाढवे रा.बोरी भडक याने पर्सनल लोन घेतले त्याचा हप्ता थकीत असल्याने तो भरण्यास सांगितला याचा राग मनात धरून त्याने काल मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वलकुंडे हे आपल्या कार्यालयासमोर फोनवर बोलत असताना पाठीमागून येऊन गाढवे याने त्यांच्या डोक्यात मानेवर कोयत्याने सपासप वार करून खून केला.

या घटनेनंतर उरुळी कांचन मध्ये एकाच खळबळ उडाली. ही बातमी सर्व शहरात पसरली याची खबर मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी उपअधीक्षक कदम तसेच पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी भेट देऊन पाहणी केली. यातील गुन्हेगार ताब्यात घेतला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.