Pune News | खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धा TMC कमी पाणीसाठा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune News | गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली असून घाटमाथा आणि धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे खडकवासला (khadakwasla dam) प्रकल्पातील धरणांच्या पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मंगळवार अखेर प्रकल्पातील चारही धरणात २७.८८ टीएमसी इतका असून, सुमारे अर्धा अब्ज घनफुटांनी (टीएमसी) तो कमी आहे. गतवर्षी २४ ऑगस्ट रोजी प्रकल्पात २८.४८ टीएमसी (Pune News) पाणीसाठा होता.

जुलै महिन्यात खडकवासला पाणलाेट क्षेत्रात चांगला पाऊस झाला.
त्यामुळे चारही धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर होती.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक चित्र दिसत असतानाच ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे पाणीसाठ्यात काही प्रमाणात घट झाली आहे.
सध्या वरसगाव आणि पानशेत या दोन्ही धरणे पूर्ण भरलेली आहेत.
तर, टेमघर धरणात पाणीसाठा ९० टक्क्यांच्या जवळपास आहे.
खडकवासला धरणही पूर्ण क्षमतेने भरले होते.
परंतु या धरणातील पाणीसाठा आता निम्म्यावर म्हणजे एक टीएमसी इतका झाला आहे.
दरम्यान, उजनी धरणात आजअखेर ३३.४० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
एकूण क्षमतेच्या ६२.३५ टक्के इतका आहे.

धरणांतील मंगळवारपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये) आणि कंसात टक्केवारी

टेमघर ३.३३ (८९.७७), वरसगाव १२.८२ (१००), पानशेत १०.६५ (१००), खडकवासला १.०७ (५४.३९), पवना ८.३४ (९८), भामा आसखेड ६.९१ (९०.१८), नीरा देवघर ११.७३ (१००), भाटघर २१.५० (९१.४९), वीर ८.१५ (८६.५९).

 

Web Title : Pune News | reduction half tmc compared to water for khadakwasla project

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | चोरीचे 15 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील एकाला अटक

Pune Crime | कॉन्ट्रॅक्ट गेल्याच्या रागातून शो-रुम मधील कर्मचाऱ्याला मारहाण, 3 जणांना अटक

Narayan Rane | राणेंच्या अटकेचा आदेश नेमका कुणी दिला? CM ठाकरे, अजित पवार, आणि अनिल परब?