Pune News |  ‘महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी 2021’ पुस्तिकेचे प्रकाशन (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | राज्य कारागृह विभागाच्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचा (State Level Annual Sports Tournament) बक्षीस वितरण (Prize Distribution) समारंभ गुरुवारी (दि.9) दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय पुणे येथे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता (Addl DGP and IG (Prisons and Correctional Services) Amitabh Gupta) यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी ‘महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी सन 2021’ या पुस्तिकेचे प्रकाशन (Pune News) करण्यात आले.

 

यावेळी विशेष आमंत्रित जुगनू गुप्ता (Juganu Gupta), कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे (Swati Sathe), कारगृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई (Yogesh Desai), प्रभारी कारागृह उपमहानिरीक्षक सुनिल ढमाळ (Sunil Dhamal), प्राचार्य सी.ए. इंदुरकर (Principal C.A. Indurkar), सांख्यिकी अधिकारी सुनेत्रा पाटील (Sunetra Patil), कारागृह विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (Pune News)

 

 

या प्रकाशनात जानेवारी ते डिसेंबर 2021 या कालावधीतील ‘कारागृह व सुधारसेवा’ विभागाची रचना व कार्य़पद्धती तसेच कारागृहनिहाय बंदीक्षमता, बांदीसंख्या, बंदीप्रकार, बंदींचे गुन्हे प्रकारानुसार वर्गीकरण, दाखल व सुटलेले बंदी, शिक्षा कालावधीनुसार व वास्तव्यानुसार बंदी वर्गीकरण, बंदीसाठी उपब्ध करुन देण्यात येणाऱ्या सोयी-सिवधांचा तपशील, कारागृह उद्योगनिहाय व शेतीतील विविध पिकांचे एकूण उत्पन्न तपशील प्रशिक्षण व खर्चाचा तपशील इ. बाबींची संख्यात्मक माहिती देण्यात आली आहे.

 

‘कारागृह व सुधारसेवा’ प्रशासनास शासकीय योजनांचे नियोजन व अंमलबजावणी करणे,
धोरणात्मक निर्णय घेणे व संशोधकांना अभ्यास करण्यासाठी तसेच स्वयंसेवी संस्थांना कारागृहात विविध उपक्रम
राबविण्यासाठी ‘महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी 2021’ या प्रकाशनाचा उपयोग होणार आहे.

 

Web Title :- Pune News | Release of ‘Maharashtra Jail Statistics 2021’ Booklet (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | लोणीकंद पोलिसांची हातभट्टी दारु बनविणाऱ्या भट्टीवर कारवाई, दारु बनवण्याचे 3 हजार लिटर कच्चे रसायन केले नष्ट

Parbhani Crime News | घरात बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु असताना चुलत भावाची आत्महत्या

Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये तिरंगी लढत, पोटनिवडणूक लढवण्यावर राहुल कलाटे ठाम