Pune News | इंधन दरवाढीमुळे रेडी मिक्स कॉंक्रीटच्या दरात वाढ करावी; शहरातील आरएमसी प्लँट बेमुदत बंद ठेवण्याची आरएमएसी असोसिएशनची घोषणा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News | खडी, क्रश सँड, सिमेंट यांच्याबरोबरच इंधनदरवाढीमुळे आता रेडी मिक्स कॉंक्रीटच्या दरातही वाढ करावी अशी मागणी पुणे आरएमसी असोसिएशनने (rmc association) केली आहे. यामागणीसाठी आजपासून शहरातील दिडशे आरएमसी प्लँट बेमुदत बंद (Pune News) ठेवण्यात येणार आहे.

पुणे आर एम सी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर (Pradip Walhekar, President, Pune RMC Association) यांनी आरएमसी व्यावसायिकांच्या अडचणींची माहीती पत्रकार परीषदेत दिली. यावेळी तानाजी वाघोले, सचिन काटे, प्रितम गंजेवार, चैतन्य रायसोनी, नरेंद्र पासलकर, विक्रम धूत, नरेंद्र महाजन, युसूफ इनामदार, मछिंद्र सातव आदी उपस्थित होते.

शहरासह चाकण, भोसरी, मोशी, वाघोली, हडपसर, कोंढवा, कात्रज, चांदणी चौक, बावधन, बाणेर, वाकड, तळेगाव, मावळ भागात रेडी मिक्स कॉंक्रीट (आरएमसी ) तयार करणारे दिडशे प्लांट आहेत.
या व्यावसायिकांना महागाईचा फटका बसला आहे. त्यामुळे आरएमसी च्या प्रति क्युबीक मीटरला असलेला दर वाढविण्याची मागणी त्यांनी केली आहे. सध्या या दरांचे प्रमाणीकरण झालेले नाही.
ते एकसारखे करण्याचे काम संघटनेने सुरू केले आहे, त्यानुसार दर मिळाले पाहीजे अशी भुमिका वाल्हेकर यांनी मांडली.
आरएमसीचा दर हा त्याच्या प्रतिनुसार ( ग्रेड ) दर ठरविला जातो. सध्या एम २० या प्रतिच्या आरएमसीच्या प्रति क्युबिक मीटरला साधारणपणे पाच हजार दोनशे रुपये इतका भाव तरी मिळाला पाहीजे.
त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रतिच्या आरएमसीला त्याप्रमाणात दरवाढ मिळणे अपेक्षित आहे.

असोसिएशनची बैठक नुकतीच पार पडली. याबैठकीत प्लांट बंद करण्याचा निर्णय झाला.
गेल्या एक आठवड्यापासून जिल्ह्यातील स्टोन क्रशरकडून होणार मालाचा पुरवठा बंद आहे.
आणि खडीच्या दरात वाढ झाली आहे.
त्यामुळे आर एम सी प्लाण्टला उत्पादनात बाधा येत आहे.
डिझेलच्या दारातही सातत्याने वाढ होत आहे. मागील तीन वर्षापासून डिझेल, पेट्रोल, रॉयल्टी,
वीज यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत.
त्याचबरोबर गाड्यांच्या आणि मशिनरीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि कर्मचार्‍यांच्या पगारातसुद्धा वाढ झाली आहे.
त्यामुळे उत्पादन काढण्यास परवडत नाही असे व्यावसायिकांनी सांगितले.

Web Title : Pune News | Rising fuel prices should lead to an increase in the price of ready mix concrete; RMC Association announces indefinite closure of RMC plants in the city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Actress Sagarika Sona Suman | ‘राज कुंद्रा म्हणाला ‘न्यूड ऑडिशन दे’, अभिनेत्री सागरिका सोना सुमनचा धक्कादायक आरोप

Raj Thackeray | ‘मी मास्क घालतच नाही’ असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी चक्क मास्क घातला

Poonam Pandey | पूनम पांडेने देखील राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; Video व्हायरल