Pune News : रस्ता सुरक्षा लोकअभियान झाले पाहिजे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील भोसले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  रस्ता सुरक्षेबाबत समाजामध्ये साक्षरता वाढली पाहिजे, रस्ता सुरक्षा अभियान लोकअभियान झाले, तर रस्ता सुरक्षेबाबत जाणीव जागृती होईल. रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन अपघात मुक्त होऊ, अशी ओळख निर्माण करावी व प्राणहानी तसेच वित्तहानी टाळावी, असे आवाहन वानवडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील भोसले यांनी केले.

वानवडी वाहतूक विभागाच्या वतीने 31 व्या वाहतूक सुरक्षा अभिनांतर्गत भैरोबानाला चौक आणि फातिमानगर चौक येथे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेश्वरसिंह राजपूत, सहायक पोलीस फौजदार काळुराम बडेकर, पोलीस हवालदार तिरुपती लिंग्गाण्णा, ज्योतिबा कुरळे, सुरेश गोरुले, राजेंद्र जाधव, रियाज शेख, ज्ञानेश्वर गायकवाड, महिला पोलीस शिपाई पल्लवी वाघचौरे यांच्या पथकाने वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व सांगून नियम पाळण्याचे आवाहन केले. तसेच, माहितीपत्रकांचे वाटप केले.