Pune News : रस्ता सुरक्षा सप्ताह ! पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे अन् उपायुक्त राहुल श्रीरामेंनी ठेवला सर्वांसमोर आदर्श, केलं रक्तदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहर वाहतूक विभागाच्या वतीने आज रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबाराचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी रक्तदान केले. शिबीरात 127 युनिट बॉटलचे संकलन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, रक्तदान करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.

pune-police-blood-donation

मुख्यालयातील पोलीस रुग्णालयात रक्तदान शिबीर पार पडले. 32 वा रस्ता सुरक्षा अभियान यंदा पार पडत आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी झाला. सात दिवस विविध कार्यक्रम यानिमित्ताने शहर वाहतूक विभागाकडून घेतले जात आहेत. रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान संपुर्ण शहरात राबविले जाते आहे. प्रत्येक चौकात वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी वाहन चालकांना रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाबद्दल सांगत असून जनजागृती करीत आहेत.

pune-police-blood-donation

रक्तदान शिबीराला प्रादेशिक रक्तपेढी ससून हॉस्पीटलकडील डॉ. सुदेशना गजबीये, डॉ. अनुजा, डॉ. नेहा राघव, डॉ. दिपाली आणि पोलिस दवाखाना येथील डॉ. राऊत उपस्थित होते. शिबीरात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह वाहतुक शाखेतील 2 पोलिस निरीक्षक, 5 सहाय्यक निरीक्षक आणि 116 कर्मचार्‍यांनी रक्तदान केले. वाहतुक शाखेच्या सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण यांनी वाहतूक शाखेच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले.

pune-police-blood-donation

 

pune-police-blood-donation