Pune News : कोंढव्यात रोडरोमियोचा उच्छाद ! मुलीच्या शाळेत जाऊन ‘चल तुझे घुमाके लाता हू’ म्हणून विनयभंग, पोलिसांकडून ‘सईम’ला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात रोड रोमियोचा एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, त्या मुलीच्या शाळेत जाऊन विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोंढव्यात ही घटना घडली असून, पोलिसांनी त्याला पकडले आहे.

सईम कलिम शेख (वय 21, भाग्योदयनगर, नवाजिश पार्क, कोंढवा) असे अटक केलेल्या रोड रोमियोचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील भाग्योदय नगर मध्ये ही शाळा आहे. आरोपी हा वारंवार या मुलीला ‘चल तुझे घुमाके लाता हु’ असे म्हणत तिची छेड काढत होता. सहा फेब्रुवारी रोजी तर त्याने कहरच केला. या मुलीच्या शाळेत जाऊन त्याने तिची छेड काढली. तुझ्यामुळे मला मार खावा लागला असे म्हणत अल्पवयीन मुलीचा हात धरून स्वतःकडे ओढले. या मुलीने हा सर्व प्रकार घरी सांगितला नंतर तिच्या भावांनी आरोपीला या याबाबत जाब विचारला असता त्याने त्यांनाही मारहाण केली.

त्यानंतर पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलिस ठाणे गाठून त्याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.