Pune News | ‘जे मिळेल त्यामध्ये खूष’ राहाणार्‍या रिपाइंची ‘महापौर’ पदाची मागणी केवळ दबावतंत्राचा भाग !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   Pune News | आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या (PMC Elections) तोंडावर भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) RPI (A) अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी १५ ते २० जागांसोबतच महापौरपदाची मागणी करत भाजपवर (BJP) दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहाता ऐनवेळी ‘जे मिळेल त्यामध्ये खूष’ राहाण्याच्या धोरणामुळे आगामी निवडणुकीतही रिपाइंला जेमतेम जागावरच समाधान मानावे लागेल अशी पक्षाची स्थिती असल्याचे राजकिय चित्र सध्या शहरात पाहायला (Pune News) मिळत आहे.

भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना (Shivsena) दूर झाल्यापासून भाजपसोबतच्या (BJP) युतीमध्ये रिपाइंचे (RPI) राजकिय वजन निश्‍चित वाढले आहे.
२०१७ मध्ये भाजपने रिपाइंला सोबत घेउन महापालिका निवडणुक लढविली.
त्यामध्ये रिपाइंला जेमतेम सात ते आठ जागा सोडण्यात आल्या होत्या.
यापैकी ५ ठिकाणी रिपाइंचे उमेदवार भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावरच निवडूण आले आहेत.
परंतू या पाचपैकी चारजणांना उपमहापौर, गटनेतेपद आणि स्थायी समितीमध्ये संधी देण्यात आली.

तर २०१७ मध्ये राज्यातही भाजपची सत्ता असल्याने विविध महामंडळावरील सदस्यपदी रिपाइंच्या काही पदाधिकार्‍यांना संधी देउन बोळवण करण्यात आली.
दोनच वर्षांपुर्वी राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर महामंडळावरील अन्य सदस्यांसोबतच रिपाइंच्या सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे.
त्यामुळे अनेकांना ‘नगरसेवक’ पद खुणावू लागले (Pune News) आहे.

 

दरम्यान, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहरातील आठपैकी एकाही मतदारसंघात संधी न देता भाजपने रिपाइंची ताकद अधोरेखित केली.
परंतू यातून रिपाइंने कुठलाच धडा घेतल्याचे पाहायला मिळत नाही.
पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रांत राज्यमंत्री पद मिळाले असले तरी या पदाचा वापर करून पक्षाची स्वतंत्र ताकद निर्माण करण्यात रिपाइंच्या स्थानीक नेतृत्वाला अपयशच आले आहे.
पक्षातील गटबाजीमुळे दरवर्षी ‘रोटेशन’ मध्ये शहरअध्यक्षपद विभागून देण्यात येत आहे.
त्यामुळे संघटनात्मक पक्ष बांधणीपासून पक्ष कोसो दूर गेला आहे त्यामुळे ‘जे मिळेत त्यामध्ये खूष’ अशीच रिपाइंची ओळख बनली आहे.
त्यामुळे निवडणुकीच्यावेळी किती जागा अथवा निवडणुकीनंतर महापौरपदासारखे पद मागणे या केवळ अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठीच्या घोषणा (Pune News) असल्याचेच दिसून येते.

 

Web Title : Pune News | RPI demand for the post of Mayor, who is happy with what he gets, is only part of the pressure mechanism!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढीचे सत्र सुरू, चांदीही महागली, जाणून घ्या आजचे नवीन दर

National Pension Scheme | NPS मध्ये मिळतात 3 प्रकारचे इन्कम टॅक्स बेनिफिट, जाणून घ्या कशाप्रकारे देतात फायदा

Pune Crime | बेकायदा सावकारी करणाऱ्या खासगी व्यवसायिकास अटक; गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई