Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या १०१व्या जयंती निमित्त सानेगुरुजी नगर वसाहतीत नगरसेवक धीरज रामंचद्र घाटे यांच्या पुणे महापालिका (Pune Corporation) विकास निधीतून आण्णा भाऊ साठे यांच्या नावाने दोन मजली सुसज्ज समाज मंदिर निर्माण करण्यात आले त्याचे उदघाटन भारतीय जनता पार्टीचे कॅन्टोमेंट मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा स्मिताताई वस्ते, नगरसेवक रघुनाथ गौडा, माजी नगरसेविका मनिषा घाटे उपस्थित होते.

कार्यक्रमाला स्थानिक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कसबा मतदार संघाच्या सरचिटणीस राणीताई कांबळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अश्विनीताई पांडे, प्रभागाचे अध्यक्ष अर्जुन खानापुरे, आप्पा खंडाळे, महिला आघाडी अध्यक्षा दिव्याताई लोळगे, ज्येष्ठ कार्यकर्ते नाना फासगे, साने गुरुजी तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र फाटे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. मा.आ. सुनील कांबळे यांचा सत्कार लोकशाहीर आण्णा भाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष सुशांत जाधव याच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा अनुसूचित आघाडीचे पुणे शहराचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव यांनी केले तर कसबा मतदार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी आभार मानले. या भागातील नागरिकांना भविष्यात समाज मंदीराचा उपयोग व्हावा या करीता हे समाज मंदिर उपलब्ध करून देण्यात येईल.

Web Tital : Pune News | Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe Samaj Mandir Dedication Ceremony Held

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Pune News | वेळेच्या बंधनांविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन; पुणे व्यापारी महासंघाच्या बैठकीत झाला निर्णय

Pune Crime | पुण्याच्या मंचरमध्ये दिवसाढवळ्या सराईतावर गोळीबार ! ओंकार उर्फ राण्याचा खात्मा, परिसरात खळबळ

Pune News | पुणे शहर काँग्रेसचे कार्यालय सचिव उत्तम भूमकर यांचे काँग्रेस भवनात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन