Pune News : ‘सुहाना’च्या नावाखाली बनावट मसाल्यांची विक्री, ‘दुकानदार’ प्रविण कंकरियाविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   प्रसिद्ध अश्या सुहाना मसाला कंपनीच्या नावे बनावट मसाल्यांची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी किराणा माल विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात प्रवीण कांकरिया (वय ४५, रा. गोसावी वस्ती, वडगाव बुद्रुक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे दुकानदाराचे नाव आहे. याबाबत संजयकुमार भिसे (वय ४६) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे हे सुहाना मसाला कंपनीत विक्री प्रतिनिधी आहेत. तर कांकरिया यांचे वडगाव बुद्रुक परिसरात कांकरिया ट्रेडिंग कंपनी किराणा मालाचे दुकान आहे. कांकरिया सुहाना मसाला कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट चिकन व मटण मसाल्याच्या पाकिटांची विक्री करत असल्याची माहिती भिसे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कांकरिया यांच्या दुकानात छापा मारत कारवाई केली. यावेळी बनावट मसाल्याची पाकिटे जप्त केली गेली.
अधिक तपास उपनिरीक्षक विशाल शिंदे करत आहेत.