Pune News | पानशेत धरणात कार बुडून पुण्याच्या शनिवार पेठेतील समृध्दी देशपांडेचा मृत्यू; पती आणि मुलगा थोडक्यात बचावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune News) पानशेत धरणाच्या (Panshet Dam) कडेच्या रस्त्यावरुन जात असताना अचानक कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पानशेत धरणाच्या पाण्यात कोसळली. यामध्ये कारमधील महिलेचा मृत्यू झाला तर महिलेचा पती आणि मुलगा सुखरुप बचावले. ही घटना आज (रविवार) दुपारी दोनच्या सुमारास पुणे-कुरण-वेल्हे (Pune-Kuran-Velhe) या रस्त्यावरील कादवे या ठिकाणी (Pune News) घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब पुण्यातील शनिवार पेठ (shaniwar peth) परिसरात वास्तव्यास आहे. समृद्धी योगेश देशपांडे Samruddhi Yogesh Deshpande (वय-33) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती योगेश देशपांडे (वय-35) आणि मुलगा (नाव समजू शकले नाही वय-9) हे या अपघातातून सुखरुप बचावले. प्राथमिक माहितीनुसार, देशपांडे कुटुंब हे तिघेजण पुण्याहून पानशेत धरण परिसरात पर्यटनासाठी (Tourism) आले होते.

कुरण गावच्या (Kuran village) पुढे आल्यानंतर या कुटुंबाने कार एका हॉटेलवर थांबवली. त्यानंतर त्यांनी कार धरणाच्या बाजूला नेली. पाऊस पडत असल्याने त्या तिघांनी कारमध्येच नाश्ता केला. दुपारी दोनच्या सुमारास ते पुढे कादवे गावाच्या दिशेने निघाले. त्यावेळी योगेश हे कार चालवत होते. त्यांच्या शेजारी त्यांचा 9 वर्षाचा मुलगा बसला होता. तर पत्नी समृद्धी पाठिमागे बसल्या होत्या. कार धरणाच्या पाण्याच्या बाजूच्या रस्त्याने जात असताना अचानक कारचा टायर फुटला.

कारचा टायर फुटल्याने योगेश यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार धरणाच्या पाण्यात कोसळली. कार काही वेळ पाण्यावर तरंगली. त्यानंतर कारमध्ये पाणी शिरल्याने कार बुडू लागली. योगेश आणि त्यांच्या मुलाने कारच्या पुढच्या खिडकीमधून पाण्यात उडी घेतली. मात्र, कारच्या मागील दरवाजाची काच बंद असल्याने समृद्धी यांना कारमधून बाहेर पडता आले नाही. मोठा आवाज आल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

समृद्धी यांना पुढच्या खिडकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
एका व्यक्तीने कारच्या जॅकनं मागच्या बाजूच्या खिडकीची काच फोडून समृद्धी यांना बाहेर काढले.
त्यांना तातडीने पानशेत येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले.
याठिकाणी डॉक्टरांनी समृद्धी यांना तपासून मृत घोषीत केले.
समृद्धी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title :- Pune News | Samrudhi Deshpande of Pune’s Shaniwar Peth dies after drowning in Panshet dam; Husband and son survived briefly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tanaji Sawant | ‘उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही सत्तेत आहात, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही’ (व्हिडिओ)

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 244 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी

Weather Updates | यूपीसह ‘या’ राज्यात जोरदार पावसाचा इशारा, जाणून घ्या महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज