Pune News | सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीस वरदान ठरणार्‍या राजाराम पुल ते फन टाईम उड्डाणपुलाच्या निविदेला मंजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | सिंहगड रस्ता (sinhagad road) परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राजाराम पूल ते फन टाईम (Rajaram Pool to Fun Time) दरम्यान सुमारे दोन कि.मी.चा उड्डाणपुल उभारण्यात येणार आहे. या कामाची सुमारे ११८ कोटी रुपयांची निविदा आज मंजुर करण्यात आली असून लवकरच कामाला सुरूवात होईल. भविष्यातील मेट्रो मार्गिकेचा (Pune Metro) विचार करूनच उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून पुढील तीन वर्षात हे काम पुर्ण करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Standing Committee Chairman Hemant Rasane) यांनी दिली.

सिंहगड रस्त्यावरील या उड्डाणपुला मुळे वेगाने विस्तारलेले खडकवासला, नर्‍हे, धायरी, वडगाव, हिंगणे तसेच पुढील गावांतील नागरिकांना शहरात जलद गतीने ये जा करणे शक्य होणार असल्याचा दावाही रासने यावेळी केला. सिंहगड रस्ता परिसरात अगदी खडकवासल्यापर्यंत दाट लोकवस्ती झाली आहे. तसेच कात्रज बाह्यवळण मार्गावरील नर्‍हे व परिसरातील गावांमध्ये जाणार्‍या नागरिकांसाठी सिंहगड रस्ता हा एकमेव पर्याय आहे. लोकसंख्या आणि वाहनांची संख्या काही लाखांच्या पुढे गेली असून दररोज सव्वा लाख वाहने या रस्त्याचा वापर करतात. यामुळे सातत्याने वाहतुक कोंडी होत असल्याने या मार्गावर राजाराम पूल ते फन टाईम चौक हा चार पदरी पुल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

फन टाईम ते राजाराम पुल ही मार्गिका सुमारे २. १२ कि.मी.ची आहे.
तर सिंहगड रस्त्याने स्वारगेटच्या दिशेने जाणारी इंडियन ह्युम पाईप कंपनी ते इनामदार चौक दरम्यानची मार्गिका एकेरी आणि उड्डाणपुलाची मार्गीक ही सुमारे दीड कि.मी.ची आहे.
उड्डाणपुलाचे काम करताना भविष्यात याच रस्त्यावरून मेट्रो मार्गिका करण्याचे नियोजन करूनच कॉलम्स व अन्य डिझाईन करण्यात येणार आहे.
यासाठी महामेट्रो कंपनीचे ना हरकत पत्रही घेण्यात आले आहे.
लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येईल. पावसाळ्याचे दिवस वगळता तीन वर्षात हे काम पुर्ण केले जाईल.

उड्डाणपुलाच्या कामासाठी १३५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित होता.
टी ऍन्ड टी इन्फ्रा लि. या कंपनीची पॉईंट पाच टक्के कमी ही सर्वात कमी दराची निविदा ठरली.
प्रशासनाने कंपनीसोबत आणखी चर्चा केल्यानंतर कंपनीने ११८ कोटी रुपयांमध्ये काम करण्याची तयारी दर्शविली असल्याचेही रासने यांनी नमूद केले.

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे गर्दीच्या ठिकाणी २.७४ कि.मी. वाहतूक थेट होणार
असल्याने वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. वडगाव (Wadgaon), धायरी (Dhayari) या गावांतील वाढत्या लोकसंख्येसाठी या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची जलद सुविधा उपलब्ध होईल.
तसेच या मार्गाने मुंबई- बंगळूर महामार्गावर (mumbai bangalore highway) जाणार्‍या वाहनांना,
तसेच हिंगणे, संतोष हॉल परिसर, सनसिटी परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे.

– हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष (Standing Committee Chairman Hemant Rasane)

Web Title :- Pune News | Sanction for tender for Rajaram Bridge to Fun Time Flyover, a boon to Sinhagad Road traffic

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | पुण्यातील उद्योजक नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाडसह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Coronavirus | महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांसह देशातील 18 जिल्हे वाढवताहेत चिंता, आरोग्य मंत्रालयाचा दावा

Maharashtra Government | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे 4 निर्णय