Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’, तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

पुणे (pune news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – pune news | पुणे महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकायला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी तयारीला लागा, असा आदेश शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. म्हाळुंगे ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) बोलत होते. तसेच आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. आम्हाला आता काही नको, तुम्हीही एकत्र येऊन मार्ग काढा, असा सल्ला पुण्यातील (Pune) राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी दिला.

Shikshan Sevak Recruitment | जम्बो भरती ! राज्यातील शिक्षण सेवकांची 6100 रिक्त पदे भरणार

sanjay raut mahalunge gram panchayat building inaugurated by shivsena mp sanjay raut important statement about mahavikas aghadi

राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आहे. मग महापालिकेवरही महाविकास आघाडी आणायला हवी, असेही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात वेगळा प्रयोग केला आणि तो आदर्श ठरला आहे. राज्यातील प्रत्येक महापालिका, ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी झाली पाहिजे. महाविकास आघाडी म्हणून ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका काहीही हातातून सोडू नका, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

मी पुन्हा येईन

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वाक्याचा आधार घेतला. मी दिल्लीत असलो तरी माती महाराष्ट्राची आहे. मी पुन्हा येईन, गावात पुन्हा येईल, प्रचारासाठी पुन्हा येईन, असं म्हणताच एकच हशा पिकला.

80 जागांचा पुनरुच्चार

संजय राऊत पुढे म्हणाले, पुण्यात आम्ही महाविकास आघाडी बनवून वाटाघाटी करु. एकत्र बसून
चर्चा करू. महाविकास आघाडीमध्ये आम्ही 80 जागा लढवू शकत नाही का ? असा प्रश्न उपस्थित
करत त्यांनी पुण्यात 80 जागा लढवण्याचा पुनरुच्चार केला. संजय राऊत यांनी यापूर्वी पुण्यात
महाविकास आघाडी करुन निवडणूक लढवली तर शिवसेना 80 जागा लढवेल असे म्हटले होते.

महापौर मुरलीधर मोहळ यांना टोला

संजय राऊत कार्यक्रमाच्या स्थळी पोहचले ते बोलण्यास उभे राहिले तोपर्यंत महापौर मुरलीधर
मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) आले नाहीत. यावर बोलताना त्यांनी महापौरांना टोला
लगावला. अजून महापौर आले नाहीत, त्यांची वाट पाहतोय. महापौरांनी सगळीकडे जायला हवं.
महापौरांना वाटतं की राज्य आपल्या हातात आलं आहे. ते त्यांना सोडायचं नाही, अशा शब्दात
राऊतांनी टोला लगावला.

हे देखील वाचा

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pune news | sanjay raut mahalunge gram panchayat building inaugurated by shivsena mp sanjay raut important statement about mahavikas aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update