Pune News | पुरंदर किल्ल्यावर उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प; पुणे महापलिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुरंदर किल्ल्यावर purandar fort छत्रपती संभाजी महाराज chatrapati sambhaji maharaj यांचे शिल्प उभा करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला आज पुणे महापलिकेच्या pune municipal corporation स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली. नगरसेविका अर्चना पाटील archana patil corporator यांनी याबाबत प्रस्ताव सदर केला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने Standing Committee Chairman Hemant Rasane यांनी याला मान्यता दिली.

पुणे शहराजवळील सिंहगडावर सन २०१७ साली शूरवीर तानाजी मालुसरे यांचे भिंतीशिल्प बसविण्यात आले आहे.
या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या मा.स्थायी समितीमार्फत र.रु.२५ लक्ष इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली होती.
याच धर्तीवर स्वराज्यप्राप्तीसाठी केलेल्या संघर्षमयी युद्धात आपले निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे यांचे भव्य शिल्प पुरंदर किल्ल्यावर उभारण्यासाठी मा.स्थायी समिती मार्फत रु.रु.०१ कोटी इतकी तरतूद करणात मान्यता देण्यात यावी.
अशी मागणी नगरसेविका पाटील यांनी केली होती. याला आज मंजुरी मिळाली.

छत्रपती श्री संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज व महाराणी सईबाईसाहेब यांचे पुत्र होत. छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जन्म पुण्यातील हडपसर पासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरंदर किल्ला येथे १४ मे १६५७ रोजी झाला होता. छत्रपती श्री संभाजी महाराज हे शूरवीर तर होतेच पण संस्कृतभाषा निपुणही होते. छत्रपती श्री संभाजी महाराज हे अतिशय प्रजाहितदक्ष होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन अनेक मोहिमा त्यांनी यशस्वीपणे राबविल्या. छत्रपती श्री संभाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य हे त्यांचे विशेष गुण होते.
अशा महापराक्रमी महापुरुषांचे शिल्प पुरंदर किल्ल्यावर म्हणजेच त्यांचे जन्म स्थळी उभारल्यास त्यांचे प्रती ही खरी मानवंदना ठरेल.
असे नगरसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले.

हे देखील वाचा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update