Pune News : विश्रांतवाडीमधील गोकुळनगरमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मॉर्निंगवॉक साठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी विश्रांतवाडी येथील गोकुळनगर बस स्टॉप समोर हा प्रकार घडला आहे. गुलाब साहेबराव मुरगुंडे (वय 61, रा. लक्ष्मी निवास भैरवनगर धानोरी) असे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे.

या प्रकरणी संदीप गुलाब मुरगुंडे (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील गुलाब मुरगुंडे हे दररोज मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर जात होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते.

यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निकम हे करत आहेत.