Pune News : हडपसर परिसरातील ग्लायडिंग सेंटरच्या आवारात ज्येष्ठ नागरिकाला हत्याराच्या धाकाने लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   हडपसर परिसरातील ग्लायडिंग सेंटरच्या आवारात वॉकिंगला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला चार जणांच्या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून लूटल्याची घटना घडली आहे. त्यांच्या गळ्यातील 1 लाखांची सोनसाखळी नेली आहे.

याप्रकरणी 59 वर्षीय नागरिकांने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मंगळवारी सायंकाळी ग्लायडिंग सेंटरच्या आवारात वॉकिंगसाठी गेले होते. वॉकिंग झाल्याने ते एका झाडाखाली थांबले होते. त्यावेळी ते मोबाइलवर बोलत होते. तेवढ्यात चारजण तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवत गळ्यातील 1 लाख रुपयांची रुद्राक्ष असणारी सोन्याची माळ लुटून नेला. उपनिरीक्षक सौरभ माने तपास करत आहेत.