Pune News : ससून हॉस्पिटल मध्ये तृतीयपंथी लोकांसाठी वेगळी OPD सुरु करावी : खा. वंदना चव्हाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  तृतीयपंथी लोकांना सर्व सामान्य लोकांन प्रमाणे मानवी हक्क मीळावे यासाठी कायदा पास झाला आहे. परंतु अजून ही या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यांच्या साठी शिक्षण, रोजगारा साठी ट्रेनिंग तथा आरोग्य हे गंभीर प्रश्न आहेत. त्यासाठी लोकप्रतिनिधी, समाज सेवक पुढे येण्याची आवश्यकता आहे. याचाच एक भाग म्हणून आम्ही आज ससून हॉस्पिटल चे डीन डॉ. मुरलीधर तांबे यांना भेटून तृतीयपंथी लोकांन साठी वेगळी ओपीडी सुरु करण्याची मागणी केली आहे. या विषयी ते सकारात्मक आहेत. लवकरच अशी ओपडी सुरु होईल. अशी आशा खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी तृतीयपंथी समाजातील सोनाली दळवी, प्रेरणा वाघेला आदी उपस्थित होत्या.

अधिक माहिती देताना चव्हाण म्हणाल्या कि, आपल्या समाजात अजूनही तृतीयपंथी लोकांना वाईट नजरेने बघितले जाते. त्यांना अस्पृश्या सारखी वागणूक दिली जाते. यामुळे हे लोक हॉस्पिटल मध्ये जाने टाळतात व गंभीर आजारा ला बळी पडतात. म्हणून ससुन हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथीयांन साठी वेगळी ओपीडी सुरु करावी. त्याचप्रमाणे तृतीयपंथी साठी वेगळे टॉयलेट असावे तथा एचआयव्ही सारख्या गंभीर आजारासाठी तृतीयपंथी व्यक्तींन साठी वेगळी खिडकी असावी. अश्या मागण्या ससुन हॉस्पिटल कडे करण्यात आल्या आहेत. यासाठी डॉ. तांबे यांच्या द्वारे येत्या 26 जानेवारी पासून ही ओपीडी सुरु करण्या चे आश्वासन देण्यात आले असून आम्ही ओपीडी सुरु होई पर्यंत याचा पाठपूरावा करणार आहोत. तृतीयपंथी लोकांन साठी ससून मध्ये स्वतंत्र ओपीडी सुरु झाल्यास महाराष्ट्रातील अशी पहिली ओपीडी असेल. असेही खा. चव्हाण यावेळी म्हणाल्या.