Pune News : शरद पवार यांच्या हस्ते ‘व्हिजन डॉक्युमेंट’चे प्रकाशन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक उपक्रम राबविणार आहे. त्या व्हिजन डॉक्युमेंट चे प्रकाशन आणि उद्धाटन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते आज पुण्यात पार पडले. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग पुणे शहर अध्यक्ष विजय डाकले यांनी सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव येथील स्मारकाचे दायित्त्व पुरातत्व विभागाकडून घेतले आहे .त्याचे पूर्ण दायित्व त्यांनीं स्वीकारून वर्षभर राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांचे उद्धाटन आज पवार यांच्या हस्ते पार पडले.

या ऐतिहासिक उपक्रमामुळे आपल्या महापुरुषाच्या वारस जतन होण्यास मदत होईल अशी भावना शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले की विजय डाकले सारखे कार्य इतरांनी ही करावे आणि आपला इतिहास आणि त्यांचे कार्य जतण करावे.

आज सकाळी शरद पवार साहेब हस्ते “ व्हिजन डॅाक्युमेंट “चे प्रकाशन झाले. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ऊपक्रमानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव सातारा येथील जन्मस्थळ स्मारकाची जबाबदारीचे संपुर्ण दायित्व विजय बापु डाकले यांनी घेतले आहे.वर्षभर दर महिण्याला विविध सामाजिक उपक्रमांच्या शुभारंभाची सुरुवात करण्यात आली. साहेबांनी यावेळी ऊपक्रमाची माहिती तर घेतलीच आणि अगोदर राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती घेऊन कौतुकही केले. आम्हाला पुढे काम करण्यासाठी साहेबांनी शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमामुळे आम्हाला चांगले काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली. अशी भावना विजय डाकले यांनी व्यक्त केली. या उपक्रमासाठी राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, गडप्रेमी दत्तात्रय जोरकर यांचे मोलाचे सहकार्य केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते मार्गदर्शक अंकुश काकडे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विजय डाकले, नगरसेविका प्रिया गदादे -पाटील, शिवाजी गदादे पाटील, सचिन डाकले इ. उपस्थित होते.