Pune News | शिक्रापूर पोलिसांचा मटका अड्डयावर छापा, लाखाचा मुद्देमाल जप्त मात्र संबंधित बीट अमलदाराचे दुर्लक्ष

शिक्रापूर (Pune News) : शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत मटका खेळणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक श्रीमंत सर्जेराव होनमाने यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सचिन विश्वंभर करमुडे, अनिल बाबुराव भांडवलकर, भरत वैजनाथ राऊत, सचिन सुधाकर जगताप, बाळू राजाराम चौधरी, सहदेव महादेव डोंगरे, शहाजी बाबुराव गव्हाणे, संतोष रमेश रजपूत, अशोक बाळासाहेब ढेरंगे यांच्या विरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना कोरेगाव भीमा येथील आदित्य पार्क येथील एका बंद खोलीत काही व्यक्ती मटका खेळत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलिस नाईक अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, संतोष पवार, निखील रावडे, लक्ष्मण शिरसकर, सागर कोंढाळकर, विकास पाटील, जयराज देवकर अदिच्या पथकाने सदर ठिकाणी जात छापा टाकला.
त्यावेळी काही व्यक्ती मटका खेळत असल्याचे निदर्शनास आले.
शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने त्या व्यक्तींना ताब्यात घेत ,मटका खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील जप्त करत एकूण एक लाख चार हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल रोख रकमेसह मिळून आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहेत.

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने कोरेगाव-भीमा मध्ये मटका अड्ड्यावर छापा टाकल्याने
कोरेगाव भिमा येथील अवैध धंद्यावर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पथक छापा टाकते, तर मग संबंधित बीटअंमलदारांना याअवैध व्यवसायांची माहीती कशी नसते? ते कारवाई का करत नाही ? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमप्रकरणी शहराध्यक्ष प्रशांत जगतापांसह 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल

 

Pune News | ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान,स्वतः कोरडे पाषाण’; NCP च्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमावरुन अजित पवार ‘ट्रोल’


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | shikrapur police raid on matka spot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update