Pune News : केवळ उदघाटनाच्या प्रतिक्षेमुळे महिन्याभरापासून ‘बंद’ ठेवलेला उड्डाणपुल शिवसेनेने वाहतुकीसाठी केला खुला

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन Pune News अगोदरच भाजपच्या हट्टापायी कोट्यवधी रुपये खर्चून नेहरू रस्त्यावर उड्डाणपुल उभारला. पुलाचे काम पुर्ण झाले आहे.

मात्र, तरीही केवळ उदघाटनासाठी ‘नेत्यांची’ प्रतिक्षेमुळे बंद ठेवण्यात आलेला हा पूल शिवसेनेने आज वाहतुकीसाठी खुला केला आहे.

महापालिकेच्यावतीने आणि स्थानीक भाजप नगरसेवक श्रीनाथ भिमाले Srinath Bhimale यांच्या प्रयत्नांतून नेहरू रस्त्यावर डायस प्लॉट ते वखार महामंडळ चौकापर्यंत उड्डाणपुल उभारण्यात आला आहे.

साधारण महिन्यापुर्वी या उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले आहे. परंतू पुलाचे काम करत असताना पुलाखालील दोन्ही बाजूचा सर्व्हिस रस्ता उखडला आहे.

पावसाळा सुरू झाल्याने या खड्ड्यातूनच वाहनचालकांना जीव मुठीत घेउन मार्गक्रमण करावे लागत असून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

केवळ उदघाटनासाठी नेत्यांची वेळ मिळत नसल्याने सत्ताधार्‍यांनी महिनाभरापासून तयार झालेला

उड्डाणपुल अद्याप बंद असल्याने शिवसेनेच्यावतीने आज पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले बॅरिकेडस् काढून

पुल वाहतुकीसाठी खुला केला आहे, अशी माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, गजानन थरकुडे, नगरसेवक विशाल धनवडे उपस्थित होते.

मुळातच मार्केटयार्डमधील व्यापार्‍यांनी, पुणे मर्चंट चेंबरसह स्थानीक नागरिकांनी हा पुल चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा आक्षेप सातत्याने घेतला आहे.

डायस प्लॉट येथे हा पुल मुठा कालव्यावरील जुन्या पुलावरून सुरू करण्यात आला आहे.

या जुन्या कालव्याच्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केल्याची माहिती प्रशासनाकडे नाही.

यावरून जड वाहने जाणार असल्याने भविष्यात अपघातही होण्याची शक्यता आहे.

असे असतानाही केवळ या परिसरात मोठी बांधकाम साईट उभारणार्‍या बिल्डरच्या फायद्यासाठी हा पुल उभारल्याची टीकाही शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी केली.

Signs Before Kidney Failure | किडनी फेल होण्यापुर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत, नजर अंदाज नका करू; जाणून घ्या

Spa in Pimpri Chinchwad | झिया थाई स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका

‘या’ गंभीर समस्यांसाठी रामबाण आहे मखाने (मखाना), पुरूषांना मिळतात जबरदस्त फायदे; फक्त या वेळी करावं सेवन, जाणून घ्या

Symptoms of High Blood Pressure | ‘ही’ आहेत उच्च रक्तदाबाची लक्षणे, निष्काळजीपणा पडू शकतो महागात; जाणून घ्या

Pune Crime News | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सराफ व्यावसायिकास ‘दणका’, केली मोक्का अंतर्गत कारवाई, जाणून घ्या प्रकरण