Pune News | पुण्यात अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी उद्धव ठाकरेंचे होर्डिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या (pune corporation election) पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली आहे. नुकताच अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस झाला. दोन्ही नेत्यांचा एकाच दिवशी वाढ दिवस असल्याने भाजप-राष्ट्रवादीच्या (BJP-NCP) नेत्यांनी पुण्यात (Pune News) दोन्ही नेत्यांचे होर्डिंग लावले होते. या होर्डिंगवरुन सुरु असलेली चर्चा थांबत नाही, तोच आता शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे होर्डिंग पुणे शहरात लावले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेने हे होर्डिंग भाजप-राष्ट्रवादीच्या होर्डिंग शेजारीच लावले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार असे शिवसेनेने लावलेल्या होर्डिंगवर लिहले आहे. या होर्डिंगमुळे (Uddhav Thackeray Hoarding) शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजप-राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच यामुळे पुण्याचा विकास कोण करत आहे यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांचे होर्डिग लावले होते.
यावर कारभारी लयभारी, कर्तव्य प्रतिदक्ष प्रत्येक कामावर जातीने लक्ष, पुण्यनगरिचा विश्वास, दादा म्हणजे विकास असे लिहिण्यात आले होते.
तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या होर्डिंगवर विकास पुरुष असे लिहण्यात आले होते.
या दोन्ही होर्डिंगची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
त्यातच आता शिवसेनेने उडी घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

माझा वाढदिवस साजरा करु नका- उद्धव ठाकरे
दरम्यान, कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला आहे.
पुरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबावर आघात झाला आहे.
या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल आहे. त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करु नये,
असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Web Title :- Pune News | shivsena hoarding of maharashtra cm uddhav thackeray after ncp ajit pawar bjp devendra fadanvis hoarding

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

EPFO | घरबसल्या नोंदवा EPF आणि EPS अकाऊंटसाठी वारसदाराचं नाव, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपुर्ण प्रोसेस

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,843 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mumbai Police Recruitment 2021 | मुंबई पोलीस दलात विधि अधिकारी पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख