Pune News | ‘फडणवीस खड्डा’, ‘चंपा खड्डा’, ‘महापौर खड्डा’; पुण्यात रस्त्यावरील खड्ड्यांचे नामकरण, शिवसेनेने केले अनोखे आंदोलन (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून सत्ताधारी भाजपाने (BJP) या समस्येकडे दुर्लक्ष चालवले आहे. महापालिकेचे (PMC) या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शहर शिवसेनेने अनोखे आंदोलन केले. शिवसेनेने (Shivsena) रस्त्यावरील या खड्ड्यांना चक्क भाजपा नेत्यांची नावे दिली. ‘फडणवीस खड्डा’, ‘चंपा खड्डा’, ‘महापौर खड्डा’ असे खड्ड्यांचे नामकरण केले. यावेळी शिवसेनेने बैलगाडी मोर्चाही काढला. मात्र बैलगाडी मोर्चाची कुणकुण लागताच, जाग आलेल्या (Pune News) महापालिकेने टिळक रोडवरील (Tilak Road) खड्डे तातडीने बुजवले.

 

यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे (Shivsena Sanjay More) म्हणाले, शहर विकासाची फ्लेक्सबाजी करून मिरवणार्‍या आणि पुणेकरांना ’स्मार्ट सिटी’चे (Smart City) स्वप्न दाखवणार्‍या सत्ताधारी भाजपाची लाज पुण्यात पडलेल्या खड्ड्यांनी चव्हाट्यावर आणली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी अतिशय वाईट प्रकारे खड्डे बुजवले (Pune City) आहेत.

 

 

मोरे पुढे म्हणाले की, काही ठिकाणी रस्त्यावर खडी बाहेर आल्याने गाडी चालक घसरून पडण्याचा धोका आहे. स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवणारे कारभारी चांगले रस्ते सुद्धा देऊ शकत नाहीत, ही शोकांतिका आहे.

महापालिकेचे जावई असल्याप्रमाणे ठेकेदार वावरत आहेत.
कुणावरही वचक राहिलेला नाही. ठेकेदार सत्ताधार्‍यांना किंमत देत नाहीत.
सर्वत्र मनमानी सुरू आहे. याचा फटका पुणेकरांना (Pune News) बसला आहे.

 

मोरे पुढे म्हणाले की, सत्ताधारी भापाची 5 वर्षे संपत आली,
तरी पुणेकरांना मुलभुत सुविधा सुद्धा मिळालेल्या नाहीत.
ठेकेदारांना वाचविण्यासाठी पुन्हा रस्त्यांच्या कामांच्या निवादा काढण्यात येणार आहेत.
म्हणजे यापूर्वी रस्त्यांवर केलेला खर्च वाया गेला आहे,
निकृष्ट कामांना जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर कारवाई होणार नाही,
आणि पुन्हा पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी केली जाणार.

 

सत्ताधारी भाजपा प्रत्येक वेळी खिसे भरण्याचे विक्रम करत आहे.
त्यांना मोदींच्या ना खाऊंगा ना खाणे दूंगा या भूमिकेचा विसर पडलेला आहे.

 

या अनोख्या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
आंदोलनात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे,
विजय देशमुख, नगरसेविका पल्लवी जावळे,
विशाल धनवडे, अशोक हरनावळ आणि मोठ्या संख्येने शिवैसनिक सहभागी झाले होते.

 

Web Title :- Pune News | shivsena workers protest against bjp and bjp leaders like devendra fadnavis, chandrakant patil, mayor muralidhar mohol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

7th Pay Commission | खुशखबर! दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना देय ग्रॅच्युएटीचे 476 कोटी मिळणार

कशाला खर्च करायचे 14 लाख, जर गॅरंटी-वॉरंटीसह 5 लाखात मिळत असेल Mahindra Scorpio, जाणून घ्या ‘ऑफर’

Ranveer And Deepika | आपल्या मुलासाठी शौर्यवीर सिंह हे नाव फायनल केलं रणवीरनं, म्हणाला – ‘दीपिका सारखी मुलगी झाली तर लाइफ सेट’