Pune News : धक्कादायक ! बापाकडूनच सलग 3 वर्षे 9 वर्षाच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार, कोंढव्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – “बाप”या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे, धक्कादायक म्हणजे सलग तीन वर्ष बापानेच 9 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत. याप्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बापाला अटक केली आहे. एका वकीलामुळे हा प्रकार उजेडात आला आहे.

कोंढवा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार 43 वर्षीय नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा फर्निचरचा व्यवसाय आहे. त्याला 4 मुली आहेत. दरम्यान यात दोन 9 वर्षांच्या मुली आहेत. 2016 पासून आरोपी बाप या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता.

मात्र याबाबत कोणाला सांगितल्यास तो चारही मुलींना मारण्याची धमकी पत्नीला देत असत. त्यामुळे त्या भितीपोटी तक्रार देत नव्हत्या. पण हा प्रकार वकीलाला समजला. त्यानंतर त्यांनी पत्नीला धीर देत तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे आणले. त्यानंतर याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या बापाला अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गपाट करत आहेत.