Pune News : भारती विद्यापीठ परिसरातील झालेल्या गोळीबाराचा पर्दाफाश, व्यावसायिक पंजाबीवर फायरिंग करणारा अशोक गवई अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –किराणा दुकानदारावर गोळीबार प्रकरणाचा उलघडा करण्यात यश आले असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पण, गोळीबार करणारा मुख्यसूत्रधार व त्याचे साथीदार पसार आहेत. 14 फेब्रुवारी रोजी रात्री हे गोळीबार प्रकरण घडले होते.

हेही वाचा : Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात पुन्हा सोन्याचे दर वधारले, जाणून घ्या 
अशोक गोविंदराव गवई (वय 55, रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर या घटनेत विशाल प्रल्हाद पंजाबी (वय 36) हे जखमी झाले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रामधन विश्वकर्मा, राजासिंग उर्फ राजकुमार आणि सुरजकुमार (रा. कात्रज, मूळ. उत्तरप्रदेश) हे तिघे फरार आहेत.

तुमच्यासाठी महत्वाचे : SBI ची खास सुविधा ! आता कागदपत्रांशिवाय घरबसल्या काही मिनिटांत उघडा खाते, जाणून घ्या प्रक्रिया
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी यांचे भारती विद्यापीठ परिसरातील दत्तनगर भागात शिवांजली चौक येथे मोठे किराणा दुकान आहे. दरम्यान ते दुकानाबाहेर थांबले असताना अचानक हल्लेखोरांनी जवळ येऊन त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात पंजाबी हे जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांकडून तपास सुरू होता. पण गोळीबार का झाला आणि कोणी केला याचा सुगावा लागत नव्हता. गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलीस याचा कसून शोध घेत होते. दरम्यान तांत्रिक तपास केत असताना अशोक गवई यांच्याबाबत माहिती मिळाली. पण अशोक पसार होता. दरम्यान तो आंबेगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी त्याने लूटमार करण्यास हा गोळीबार केल्याचे सांगितले आहे. त्यांनी असे अनेक प्रकार केले असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकनाथ खडसेंनी सांगितलं जळगाव महापालिकेतील विजयाचे ‘गुपित’, म्हणाले…

ही कारवाई उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, सहाय्यक निरीक्षक वैभव पवार, कर्मचारी प्रणव संकपाळ, संतोष अनुसे, शिवदत्ता गायकवाड व त्यांच्या पथकाने केली आहे.

Read More..
कोरोनाचा धोका वाढला ! CM ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, मोठा निर्णय घेणार ?

राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार का ? आरोग्य मंत्री टोपे म्हणाले…

Sachin Vaze Case : प्रकरणाचं नागपूर कनेक्शन? खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत केला ‘हा’ दावा

TMC म्हणजे ‘ट्रान्सफर माय कमिशन’ – PM मोदी

फडणवीसांनी घेतली PM मोदी, HM शाह यांची भेट, राज्यातील वाझे प्रकरणावर केली चर्चा?