Pune News : पुण्यात भरदिवसा बिल्डरवर गोळीबार, प्रचंड खळबळ; पोलिस घटनास्थळी दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील डुक्कर खिंड भागात एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकावर हल्लेखोरांनी गोळीबार (Shooting) केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. यात 4 ते 5 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. काही वेळापूर्वी ही घटना घडली आहे.

उस्मानाबाद : कळंबमध्ये वॉचमनचा गोळ्या झाडून खून, परिसरात प्रचंड खळबळ

बांधकाम व्यवसायिक रवींद्र सखाराम तागुंदे (वय 36, रा. वारजे) यांच्यावर गोळीबार (Shooting) झाला आहे.
सुदैवाने यात ते जखमी झालेले नाहीत याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हे सकाळी साडे नऊ ते 10 वाजण्याच्या सुमारास  डुक्कर खिंड परिसरातून जात होते.
या दरम्यान दोन दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांना अडविले.
एकाने पिस्तूल रोखत त्यांच्यावर गोळीबार केला.
सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले आहेत.
नंतर देखील आणखी पुढे जाऊन त्यांच्या दिशेने गोळी झाडली असल्याची माहिती आहे.
हल्लेखोर पसार होताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
लागलीच वरिष्ठ अधिकारी व वारजे माळवाडी पोलिसांनी धाव घेतली आहे.
हल्ला कोणी आणि का केला अद्याप समजू शकलेले नाही.
त्याचा तपस सुरु आहे या घटनेने मात्र शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

120 कोटी रुपयांचे 34 किलो चरस ! ‘या’ कारणामुळे पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ८ पोलीस तडकाफडकी निलंबित

Maharashtra Unlock News : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’, नियमावली जाहीर; 5 टप्प्यात होणार अंमलबजावणी, जाणून घ्या

SBI, HDFC, ICICI च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, जून महिन्याअखेर बंद होणार ‘ही’ सुविधा

UP मधील गंगेतील मृतदेहांची महाराष्ट्रात चर्चा होते, पण बीडमधील मृतदेहांच्या विटंबनेची चर्चा होत नाही – देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या

तिसर्‍या लाटेपूर्वी खुशखबर ! देशात मुलांना याच महिन्यात मिळू शकते व्हॅक्सीन, जाणून घ्या कुठपर्यंत पोहचली तयारी