Shriguru Balaji Tambe | आयुर्वेदाचार्य श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे 81 वर्षी निधन

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  आयुर्वेद (Ayurveda) आणि योग शिक्षणाच्या (Yoga education) माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरु बालाजी तांबे (Shriguru Balaji Tambe) यांचे आज (मंगळवार) वयाच्या 81 वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय, स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. बालाजी तांबे (Shriguru Balaji Tambe) यांची मागील आठवड्यात प्रकृती खाल्याने त्यांच्यावर पुण्यातील (Pune) एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बालाजी तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म व संगीतोपचार (music therapy) यांचा पाच दशकाहून अधिक काळ प्रचार व प्रसार केला. त्यांनी विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. शास्त्रशुद्ध आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वेदिक औषधांचे त्यांनी संशोधन व निर्मिती (Research and production) करुन ती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली होती. नागरिकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.यातून विविध समाज घटकांना आयुर्वेदाशी जोडले.

बालाजी तांबे यांनी केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील आयुर्वेदाचा प्रचार केला.
त्यांनी लोणावळ्याजवळील (Lonavala) कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली.
यानिमित्ताने अभिनेते, संगीत साहित्य, राजकीय नेते, कला अशा क्षेत्रातील अनेक दिग्गज आश्रमाला भेट देत होते.
याशिवाय त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी परदेशातून देखील अनेक लोक आश्रमात येत असत.

 

Web Title : Pune News | shri guru balaji tambe passes away he is 81 years old

Pimpri Police | आर्मी इंटलिजन्सची पिंपरी-चिंचवड पोलिसांवर तीव्र ‘नाराजी’, जबाबदार कोण?

Benefits of Sleeping Naked | पुरूषांनी कपडे न घालता झोपलं पाहिजे, होतील ‘हे’ खास फायदे; महिलांसाठी देखील चांगलं

Google वर 5000% जास्त सर्च केला गेला ‘हा’ शब्द ! नेमकं काय आहे ते जे संपुर्ण जगाला जाणून घ्यायचंय?